Mumbai Air Pollution: मुंबईची हवा बिघडली! ऐन दिवाळीत आरोग्य संकट, सर्वाधिक धोका कुठं?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Air Pollution: ऐन दिवाळीत मुंबईकतील हवा बिघडली असून प्रदुषणाचा विळखा वाढला आहे. त्यामुळे आरोग्याला धोका वाढला असून योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.
मुंबई : मुंबईत कधी कडाक्याचे ऊन तर कधी जोरदार पाऊस असतो, तसेच शहरात चालू असलेली इमारती, रस्ते, मेट्रोसारखी कामे, वाहतूक आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे मुंबईकरांना वर्षभर ध्वनी व हवा प्रदूषण सहन करावे लागते. पण यंदा दिवाळीच्या हंगामात, वाऱ्याचा कमी वेग आणि आतषबाजीमुळे हवेतील प्रदूषण अत्यंत गंभीर स्तरावर पोहोचले आहे आणि याचा परिणाम थेट मुंबईकरांच्या आरोग्यावर होऊ शकतो.
ऑक्टोबरमध्ये हवा सर्वाधिक दूषित
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB) आणि CREA च्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील 19 मॉनिटरिंग स्टेशनवर PM 2.5 आणि 7 स्टेशनवर PM 10 ची या वर्षातील सर्वाधिक नोंद झाली. ही वाढ 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान प्रामुख्याने दिसून आली.
1) PM 2.5 (2.5 मायक्रॉन व्यासाचे कण) इतके सूक्ष्म आहेत की ते फुप्फुसांमध्ये प्रवेश करून रक्तवाहिन्यांमध्ये मिसळू शकतात.
advertisement
2) PM 10 (10 मायक्रॉन व्यासाचे कण) हे थोडे मोठे असले तरी श्वसन प्रणाली आणि हृदयाच्या कार्यावर गंभीर परिणाम करू शकतात.
कुठे किती प्रदूषण?
PM 10 (10 मायक्रॉन व्यासाचे कण) ची नोंद काही प्रमुख ठिकाणी:
advertisement
पवई – 200 (20 ऑक्टो.)
देवनार – 321 (20 ऑक्टो.)
बोरीवली पू. – 241 (19 ऑक्टो.)
मालाड प. – 322 (21 ऑक्टो.)
मुलुंड प. – 234 (20 ऑक्टो.)
कांदिवली प. – 134 (21 ऑक्टो.)
घाटकोपर – 224 (20 ऑक्टो.)
PM 2.5 (2.5 मायक्रॉन व्यासाचे सूक्ष्म कण) ची नोंद:
विलेपार्ले – 104 (19 ऑक्टो.)
advertisement
बीकेसी – 212 (21 ऑक्टो.)
माझगाव – 130 (21 ऑक्टो.)
कुलाबा – 167 (20 ऑक्टो.)
चकाला – 129 (20 ऑक्टो.)
वरळी – 124 (21 ऑक्टो.)
बीकेसी – 129 (20 ऑक्टो.)
चेंबूर – 100 (21 ऑक्टो.)
भायखळा – 119 (21 ऑक्टो.)
आरोग्यावर संभाव्य परिणाम
यंदाच्या दिवाळीत हवा इतकी प्रदूषित झाली आहे की सामान्य लोकांनाही श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
advertisement
- फुप्फुसाचे आजार: दम्याचे संकट असलेल्या लोकांना त्रास वाढू शकतो.
- हृदयविकार: सूक्ष्म कण रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करून हृदयावर ताण निर्माण करतात.
- मेंदूवर परिणाम: दीर्घकालीन प्रदूषणामुळे मेंदूवरील ताण आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो.
- धोक्यातील गट: वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला आणि आधीपासून श्वसन किंवा हृदयाचे आजार असलेले लोक अधिक धोका पत्करतात.
दिवाळीचा अतिरिक्त धोका
view commentsदिवाळीच्या फटाक्यांमुळे हवेतील PM 2.5 आणि PM 10 कणांची संख्या झपाट्याने वाढते. तसेच, वाऱ्याचा कमी वेग असल्याने हे प्रदूषण हवेत दीर्घकाळ टिकते, ज्यामुळे मुंबईकरांना घराबाहेर जाणे, श्वास घेणे आणि दैनंदिन कामकाज करताना आरोग्यावर धोका निर्माण होतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 10:03 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Air Pollution: मुंबईची हवा बिघडली! ऐन दिवाळीत आरोग्य संकट, सर्वाधिक धोका कुठं?


