Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीला धावणार विशेष रेल्वे, कधी आणि कुठं? पाहा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरीला जाणाऱ्या भाविकांसाठी खूशखबर आहे. पंढरीच्या वाटेवर रेल्वे विशेष ट्रेन चालवणार आहे. वेळापत्रक आणि थांबे जाणून घेऊ.
सोलापूर - कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक येत असतात. यामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कार्तिकी एकादशीला विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
मिरज - लातूर अनारक्षित विशेष गाडी
गाडी क्रमांक 01443 मिरज - लातूर अनारक्षित विशेष गाडी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता मिरज येथून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी लातूर येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण 6 फेऱ्या होणार आहेत तर पंढरपूर येथे 10:15 मिनिटांनी आगमन होईल व प्रस्थान सकाळी 10:20 वाजता होईल.
advertisement
उलट दिशेने जाणाऱ्या लातूर - मिरज अनारक्षित गाडी क्रमांक 01444 ही विशेष गाडी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज दुपारी 4 वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री 11:45 मिनिटांनी मिरजला पोहोचेल. या गाडीच्या देखील एकूण 6 फेऱ्या होणार असून पंढरपूरला सकाळी 07:45 वाजता या गाडीचे आगमन होईल व सकाळी 07:50 वाजता प्रस्थान होईल.
advertisement
मिरज - लातूर अनारक्षित विशेष गाडी क्रमांक 01441 दिनांक 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत दररोज रात्री 10 वाजता मिरजहून सुटेल आणि लातूरला दुसऱ्या दिवशी पहाटे 05:30 मिनिटांनी पोहोचणार असून या गाडीच्या देखील एकूण 6 फेऱ्या होणार आहेत. तर या गाडीचे आगमन पंढरपुरात रात्री 11:50 वाजता होईल व रात्री 11:55 वाजता प्रस्थान होईल.
advertisement
थांबे कुठं?
या गाडीला अरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी, शेंद्री, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरूड, औसा रोड, आणि हरंगुळ येथे थांबे देण्यात आले आहेत.
सोलापूर - मिरज अनारक्षित विशेष गाडी
गाडी क्रमांक 01419 सोलापूर - मिरज अनारक्षित विशेष गाडी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता सोलापूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 12:10 वाजता मिरजला पोहोचेल. सोलापूर- मिरज अनारक्षित विशेष गाडीच्या 6 फेऱ्या होणार असून ही गाडी पंढरपूरला सकाळी 09:20 वाजता येईल आणि 9.25 वाजता गाडीचे प्रस्थान होईल.
advertisement
उलट दिशेने जाणारी गाडी क्रमांक 01420 मिरज - सोलापूर अनारक्षित विशेष ट्रेन 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी मिरजहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता सोलापूरला पोहोचेल. या गाडीच्या देखील एकूण 6 फेऱ्या होणार असून पंढरपूरला या गाडीचे आगमन दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी होईल आणि प्रस्थान 02 वाजून 55 मिनिटांनी होईल.
advertisement
थांबे कुठं?
view commentsया गाडीला मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, महांकाळ, सलगरे आणि अरग येथे थांबे देण्यात आले आहेत. पंढरपूरला कार्तिकी एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांनी सदर विशेष गाड्यांचा वेळ लक्षात घेऊन आपला प्रवास निश्चित आणि सुरक्षित करावा, असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागामार्फत करण्यात आले आहे.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
October 24, 2025 11:18 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशीला धावणार विशेष रेल्वे, कधी आणि कुठं? पाहा वेळापत्रक


