Mumbai Weather : पुढील 24 तास धोक्याचे, मुंबईसह कोकणाला पाऊस झोडपणार, हवामान विभागाचा अलर्ट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या उकाड्याने हैराण झालेले नागरिक आता सततच्या सरींमुळे दिलासा अनुभवत आहेत. मात्र यामुळे अनेक नागरिकांचे हाल होत आहेत. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी आज म्हणजेच 27 ऑक्टोबर 2025 रोजी यलो अलर्ट जारी केला आहे.
advertisement
काल दिवसभर मुंबईत जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी दुपारी आणि सायंकाळी अचानक मुसळधार पावसाचा जोर वाढला. आजही अशाच प्रकारचं हवामान राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील.मुंबईचे आजचे किमान तापमान 26 अंश सेल्सियस आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सियस इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असून, दमट उकाड्याने नागरिकांना त्रास होऊ शकतो.
advertisement
ठाणे आणि नवी मुंबईमध्ये देखील आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काल या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर काही भागांमध्ये आकाश ढगाळ राहिलं आणि हलक्या सरी पडल्या. आजदेखील अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवसभर उन्हाचा पारा वाढत असला तरी अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे हवामानात गारवा जाणवतो आहे.
advertisement
advertisement
कोकण किनारपट्टीवर आजही हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून, काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू आहेत. सततच्या या पावसामुळे भात कापणीच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, कारण ओलसर हवामानामुळे शेतात काम करणे कठीण झाले आहे.


