आजपासून ७ राशींचा गोल्डन टाइम सुरू झाला, सुख समाधानासह बक्कळ पैसा मिळणार

Last Updated:

Astrology News : वैदिक पंचांगानुसार, आज सोमवार, 27 ऑक्टोबर 2025 हा दिवस ग्रहयोगांच्या दृष्टीने अत्यंत विशेष मानला जात आहे. आज काही दुर्लभ ग्रहसंयोग निर्माण होत असून, त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवेल.

astrology news
astrology news
मुंबई : वैदिक पंचांगानुसार, आज सोमवार, 27 ऑक्टोबर 2025 हा दिवस ग्रहयोगांच्या दृष्टीने अत्यंत विशेष मानला जात आहे. आज काही दुर्लभ ग्रहसंयोग निर्माण होत असून, त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवेल. भगवान शिवाच्या कृपेने अनेक राशींना शुभ फळ मिळण्याची शक्यता आहे, तर काहींनी संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. चला जाणून घेऊया आजचे सर्व राशींचे राशी भविष्य
मेष
आज आर्थिक बाबतीत थोडी निराशा येऊ शकते, कारण अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. तथापि, तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.
वृषभ
आज तुमच्या एखाद्या निर्णयाला कुटुंबीयांचा विरोध होऊ शकतो. तरीही, समाजात तुमची चांगली छाप पडेल. संवादात संयम ठेवा आणि मतभेद टाळा.
मिथुन
आज अहंकार दुखावल्यामुळे मन अस्वस्थ राहू शकते, पण दिवसाच्या उत्तरार्धात चांगली बातमी मिळेल. तुमच्या कल्पना आणि स्वप्ने प्रत्यक्षात उतरू लागतील.
advertisement
कर्क
आज तुमचा दिलदार आणि प्रेमळ स्वभाव लोकांना आकर्षित करेल. मात्र, स्वतःचे मत नेहमीच योग्य आहे असा हट्ट टाळा. नातेवाईकांशी संवाद सौम्य ठेवा.
सिंह
थोडे आर्थिक ताण जाणवतील, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचे मत महत्त्वाचे ठरेल, त्यांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या.
कन्या
आज खिशात पैसे आल्यामुळे खरेदीचा मोह होईल. तरीही बचत करण्याचा प्रयत्न करा. करिअर आणि शिक्षणाच्या दृष्टीने दिवस फलदायी ठरेल.
advertisement
तूळ
आज तुमचे बोलणे आणि विचार इतरांना प्रभावित करतील. महिलांसाठी हा दिवस विशेष सक्रियतेचा आहे. समाजकार्यात किंवा सर्जनशील कामात सहभाग घ्याल.
वृश्चिक
आज इतरांना मदत करण्याचा आनंद मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि मनात समाधान निर्माण होईल.
धनु
लोकांचे कौतुक मिळवण्यासाठी तुम्ही अनावश्यक खर्च करू शकता. त्यामुळे थोडा संयम बाळगा. आत्मविश्वास ठेवा आणि वास्तववादी दृष्टीकोन ठेवा.
advertisement
मकर
घरातील वातावरण उत्साहवर्धक आणि आनंदी राहील. तुम्ही स्वतः कामात पुढाकार घ्याल आणि इतरांनाही प्रेरित कराल. घरगुती जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पडतील.
कुंभ
आज तुमच्यासाठी आनंददायी आणि खेळीमेळीचा दिवस आहे. कामे वेळेत पूर्ण होतील. घरासाठी नवीन वस्तू किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार कराल.
मीन
घरातील वातावरणात काही बदल कराल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. मात्र, डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अति ताण किंवा स्क्रीन टाइम टाळा.
advertisement
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
आजपासून ७ राशींचा गोल्डन टाइम सुरू झाला, सुख समाधानासह बक्कळ पैसा मिळणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement