Aajache Rashibhavishya: पैसा, प्रतिष्ठा की संकटांचा डोंकर, मेष ते मीन राशींसाठी मंगळवार कसा? आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: आजचा मंगळवार काही राशींसाठी संधी तर काहींसाठी नवी आव्हाने घेऊन येणार आहे. तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष राशी -आजच्या दिवशी धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. आज तुमचा शुभ अंक ९ असणार आहे.
advertisement
वृषभ राशी-प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. नको असलेली कामे टाळा. असे केल्यास नक्की फायदा जाणवेल. आज तुमचा शुभ अंक ८ असणार आहे.
advertisement
मिथुन राशी -तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा, केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाऱ्यांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. आज तुमचा शुभ अंक ६ आहे.
advertisement
कर्क राशी -विवाहित लोकांना आज आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल. आज तुमचा शुभ अंक 2 असणार आहे.
advertisement
सिंह राशी -अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आज मार्गी लागतील. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. आजचा दिवस हा तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा. हातात घेतलेली कामे पूर्ण करा, योग्य फळ प्राप्त होईल. आज तुमचा शुभ अंक 4 आहे.
advertisement
कन्या राशी -तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे तर, आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.
advertisement
तुळ राशी -तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलंत तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस आनंद घेऊन येईल. तुमचा शुभ अंक 5 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी -आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
धनु राशी -गरज नसलेले कोणतेही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, ज्या लोकांनी नातेवाइकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावी लागू शकते. एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केवळ तुम्हीच नाही तर तुमचे कुटुंबीयदेखील मोहीत होतील. आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुमचा शुभ अंक 3 असणार आहे.
advertisement
मकर राशी -निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
कुंभ राशी -पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमाऊ शकतो. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
advertisement


