Indurikar Maharaj:...म्हणून लेकीचा साखरपुडा मोठा केला, इंदुरीकर महाराजांचं ट्रोलकऱ्यांना सणसणीत उत्तर

Last Updated:

हा साखरपुडा इतक्या मोठ्या पद्धतीने केला तो हेच दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो.

indurikar maharaj
indurikar maharaj
संगमनेर:  प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर देशमुख हे आपल्या कीर्तनातून नेहमी समाजाचं प्रबोधन करत असतात. सामाजिक प्रश्नांवर इंदुरीकर महाराज नेहमी परखडपणे भाष्य करत असतात. पण, लग्नात कर्ज काढून उधळपट्टी करू नका असा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा शाही साखरपुडा पार पडला. त्यामुळे या सोहळ्यावरून इंदुरीकर महाराजांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलं. पण, अखेरीस इंदुरीकर महाराजांनी आपल्या भाषेत ट्रोल लोकांना सणसणीत उत्तर दिलं आहे.
कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा संगमनेरमधील वसंत लॉन्स इथं तीन दिवसांपूर्वी संपन्न झाला. अतिशय थाटामाटात झालेल्या सोहळ्याला राजकीय सामाजिक, वारकरी सांप्रदायातले अनेक जण उपस्थित होते.  पण हा साखरपुडा काही साधा सुद्धा नव्हता. एसी हॉल, सोन्याचे दाग-दागिने अन् लग्नालाही लाजवेल असा शाही थाट होता. यावरून सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांना टीकेला सामोरं जावं लागलं. पण, 'गेली २० वर्ष लोकांनी नाव ठेवली तेच सहन करत आलो, पण आता यावेळी मी चांगले बदल केले. साखरपुड्यात मी कुणाचाही सत्कार सोहळा केला नाही. या पुढे एकाही व्यक्तीचा सत्कार करायचा नाही, असं ठरवलं आणि तेच केलं. करायचा असेल तर सगळ्यांचा करायचा नाहीतर एकाचाही करायचं नाही असं ठरवलं होतं. हा साखरपुडा इतक्या मोठ्या पद्धतीने केला तो हेच दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो. बदल करण्याचं ठरवलं तर आपण ते करू शकतो, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी ट्रोलकऱ्यांना उत्तर दिलं.
advertisement
तसंच, माझ्या लेकीच्या साखरपुड्यात महाराष्ट्रीयन जेवण ठेवलं. परदेशी, चायनीज नाही म्हणजे नाहीच ठेवलं. जेवण वाढणारे वाढकरी हे वारकऱ्यांच्या पोशाखात होते. सगळ्यांना समान वागणूक दिली. लेकीच्या साखरपुड्यात सगळे खाली बसले होते, जे आजारी आहे त्यांना खुर्चीवर बसवलं. वारकरी संप्रदायाने एकात्मता आणि संघटन कौशल्य शिकवलं. मी कधीच कुणाला कमी पाहिलं नाही, कुणाची स्तुती केली नाही आणि निंदाही केली नाही' असंही इंदुरीकर महाराजांनी आवर्जून सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indurikar Maharaj:...म्हणून लेकीचा साखरपुडा मोठा केला, इंदुरीकर महाराजांचं ट्रोलकऱ्यांना सणसणीत उत्तर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement