IND vs SA Final : PM मोदींसमोर उभी राहिली, पण तिच्याकडे मेडलच नव्हता, मग दुसऱ्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा,VIDEO

Last Updated:

वुमेन्स वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या महिला संघाने बुधवारी वर्ल्डकप पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडीओ आज सकाळच्या सुमारास समोर आला होता.तर भेटीचे फोटो बुधवारी रात्रीच समोर आले होते.

ind vs sa final
ind vs sa final
Team India Women meet Pm Narendra Modi : वुमेन्स वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या महिला संघाने बुधवारी वर्ल्डकप पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतली होती. या भेटीचा व्हिडीओ आज सकाळच्या सुमारास समोर आला होता.तर भेटीचे फोटो बुधवारी रात्रीच समोर आले होते.या फोटोसेशन दरम्यान एक किस्सा घडला होता. टीम इंडियाची सलामीवीर प्रतिका रावल हिच्याजवळ मेडलच नव्हता. त्यावेळेस दुसऱ्या एका खेळाडूने आपल्या गळ्यात मेडल घालून तिच्या गळ्यात घातलं होतं.त्यामुळे ही खेळाडू कोण होती? आणि प्रतिका रावलकडे इतर खेळाडूंप्रमाणे मेडल का नव्हतं? हे जाणून घेऊयात.
खरं तर वुमेन्स वर्ल्डकप टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत फोटोसेशन केले होते. या फोटोसेशन दरम्यान प्रतिका रावल इतर खेळाडूंसोबत उभी होती. पण तिच्या गळ्यात मेडलच नव्हतं. कारण ती फायनल सामन्यात खेळलीच नव्हती. आणि जे खेळाडू फायनल सामन्यात खेळतात त्यांनाच मेडल दिलं जातं. अशापरिस्थितीत तिच्याकडे मेडल नव्हतं.
advertisement
आता तिच्या एकटीच्या गळ्यात मेडल नसल्याने ते खूप विचित्र वाटले असते.त्यामुळे ही गोष्ट पंतप्रधान मोदी यांच्या मागे उभ्या असलेल्या अमनज्योतला कळताच तिने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या गळ्यातला मेडल काढून तिला दिला.खंर तर प्रत्येकाला वर्ल्ड कपमध्ये आपल्याला मिळालेल्या गोष्टी मिरवायला आवडतात. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत फोटो काढून मिरवायचं असेल तर प्रत्येक जण आपआपलाच विचार करतो. पण अमनज्योतने मनाचा मोठेपणा दाखवत तिला आपला फोटोसेशन पु्र्ता मेडल दिला होता.
advertisement
त्यामुळे जर तुम्ही फोटो निरखून पाहाल तर अमनज्योतच्या गळ्यात मेडल नाही आहे. उलट ती फायनल सामना खेळली होती आणि मॅच विनिंग कॅच देखील होती. तर प्रतिका रावलच्या गळ्यात मेडल होते. हे फक्त आणि फक्त अमनज्योतमुळे होऊ शकले.त्यामुळे अमनज्योतच्या या कृतीच इतरांना देखील खूप कौतुक केले आहे.
पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली? 
पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला खेळाडूंना खास लाडू दिले. यावेळी पतंप्रधान मोदी यांनी सर्वांची नाव घेऊन त्यांना लाडू घेण्यास आग्रह केला. यावेळी अनेक खेळाडूंनी लाडू घेतले. ज्यावेळेस स्मृती मानधना लाडू घ्यायला गेली त्यावेळेस तिने मी पहिल्यांदाच खात असल्याचे सांगितले.यावर पंतप्रधान मोदी यांनी, तुमच्यासाठी भेल आणली आहे. असे म्हणताच स्मृती म्हणाली मला खूप आवडतं. आणि डीएसपीसाठी (दीप्ती शर्मा) पनीर आहे.यानंतर शेवटी कर्णधार हरमनप्रीत कौरने लाडू घेतला. या दरम्यान पंतप्रधान खेळाडूंना हे देखील म्हणतात की आता तुम्हाला खाण्यापासून रोखणार नाही ना.
advertisement
दरम्यान सर्व खेळाडू खात असताना प्रतिका रावल व्हिलचेअरवर बसलेली होती. पंतप्रधान मोदी यांनी तिलाच काही न खाताना पाहताच ते तिच्याजवळ गेले. यावेळी पंतप्रधान मोदी तिला विचारतात, तुला काय आवडतं? असे म्हणताच ते थेट समोरील टेबलवरील स्नॅक्स तिला खायला देतात. तुला आवडतं की नाही? असे म्हणताच एकच हशा पिकतो. यावेळी प्रतिका रावल स्नॅक्स घेऊन खायला सुरूवात करते.
advertisement
दरम्यान खेळाडूंच्या नाश्त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेदरम्यान दीप्ती शर्माच्या हातावरील हनुमानाचा टॅटू आणि इस्टाग्रामवरील जय श्री रामचाही उल्लेख करतात. त्यामुळे खेळाडूंना प्रश्न पडतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या गोष्टी लक्षात राहतात कशा? शेवटी राहून राहुन स्मृती मानधनाच त्यांना विचारते, तुम्हाला या सर्व गोष्टींची आठवण कशी राहते? यावर पंतप्रधान मोदी सांगतात मी वर्तमानमध्ये जगतो.या उत्तरानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलते.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA Final : PM मोदींसमोर उभी राहिली, पण तिच्याकडे मेडलच नव्हता, मग दुसऱ्या खेळाडूने दाखवला मनाचा मोठेपणा,VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement