Parth Pawar : पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अखेर गुन्हे दाखल, पार्थ पवारांबद्दल नवी माहिती समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अखेरीस या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अखेरीस या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. मात्र, यामध्ये पार्थ पवार यांचं नाव नसल्याचं समोर आलं आहे. तक्रारदाराने ३ जणांवर सुमारे 6 कोटींचा मुद्रांक शुल्क न भरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री पार्थ पवार यांच्या नावाने जमीन घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. या प्रकरणी आता पुण्यातील बावधन पोलीस स्टेशनमध्ये खरेदीदार कंपनी अमेडिया इंटरप्राइजेस एल. एल. पी. चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीबाबत कुलमुख्यातपत्र असणारी महिला शीतल तेजवानी आणि निलंबित सह दुय्यम निबंधक आर. बी. तारु आदींवर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पार्थ पवारांविरोधात गुन्हा नाही
या प्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग १ संतोष अशोक हिंगाणे यांनी प्रशासकीय चौकशी करून तक्रार दिली आहे. या प्रकरणी ४२०, ४०९, 334 आणि भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (4) 316 (5) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. ३ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव समोर आलं आहे. पण सध्या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, अमेडिया इंटरप्राइजेस एल. एल. पी. चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीबाबत कुलमुख्यातपत्र असणारी महिला शीतल तेजवानी आणि निलंबित सह दुय्यम निबंधक आर. बी. तारु यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती बावधान पोलिसांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
November 06, 2025 10:42 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Parth Pawar : पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अखेर गुन्हे दाखल, पार्थ पवारांबद्दल नवी माहिती समोर


