गोव्याच्या किनाऱ्यावर लग्नाचा शाही थाट! पण 44 डिग्रीत शूट करताना तेजश्री प्रधानची झाली वाईट अवस्था, म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Veen Doghatli Hi Tutena Update : 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत सध्या डेस्टिनेशन बीच वेडिंगचा शाही थाट सुरू असून, हे चित्रीकरण गोव्याच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर पार पडले.
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' सध्या तिच्या धमाकेदार ट्विस्टमुळे चर्चेत आहे. मालिकेत सध्या डेस्टिनेशन बीच वेडिंगचा शाही थाट सुरू असून, हे चित्रीकरण गोव्याच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यावर पार पडले. या खास शूटिंगचा अनुभव मालिकेतील 'स्वानंदी' साकारणाऱ्या अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकताच गोव्यात माशांवर मारलेला ताव आणि ४४ डिग्री तापमानामुळे झालेली वाईट अवस्था, असे दोन्ही किस्से सांगितले.
माशांवर ताव आणि 44 डिग्रीचा चटका
गोव्यातील शूटिंगबद्दल बोलताना तेजश्री प्रधानने दोन अत्यंत भिन्न गोष्टींचा उल्लेख केला. तेजश्री म्हणाली, "डेस्टिनेशन बीच वेडिंगचे शूटिंग करताना मी कोणती गोष्ट सगळ्यांत जास्त एन्जॉय केली असेन, तर ती म्हणजे तिथले मासे खाणे. गोव्यातील पदार्थांवर मी भरपूर ताव मारला." पण या शूटिंगमधील सगळ्यात मोठी आव्हानात्मक गोष्ट म्हणजे ४० ते ४४ डिग्री उष्ण तापमानात समुद्रकिनारी शूट करणे. तेजश्रीने सांगितले, "इतक्या उष्ण वातावरणात वेडिंग लूक, भरगच्च दागिने, मेकअप सांभाळणं आणि त्या सगळ्यात 'स्वानंदी'च्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, हे खरंच खूप कठीण होतं."
advertisement
सूर्य मावळतानाचा 'तो' खास क्षण
अति उष्णता आणि शूटिंगचा ताण असूनही, तेजश्री आणि संपूर्ण टीमने हा अनुभव मनापासून एन्जॉय केला. याचे कारण होते, गोव्याचा सुंदर निसर्गरम्य देखावा. तेजश्री म्हणाली, "लोकेशन इतकं सुंदर होतं की, सूर्य मावळताना हवामान एकदम थंड आणि आल्हाददायक व्हायचं. आकाशात दिसणारा तो सुंदर तांबडा रंग पाहताना आमचा सगळा थकवा कुठच्या कुठे गायब व्हायचा. आम्ही सगळे सूर्यास्ताचा मस्त आनंद घ्यायचो."
advertisement
advertisement
वधू आणि वराचा शाही लूक
या मालिकेत मराठी टीव्हीवर पहिल्यांदाच डेस्टिनेशन बीच वेडिंग दाखवले जात असल्याचा दावा तेजश्रीने केला आहे. तिने तिच्या हळद आणि वेडिंग लूकबद्दल सांगितले की, राजवाडे कुटुंब हे एक प्रतिष्ठित घराणं म्हणून दाखवलं जात असल्यामुळे, त्यांच्या स्टेटसला साजेसा लूक करण्यात आला. वधू म्हणून स्वानंदी आणि अधिरा यांच्या स्वभावानुसार त्यांचे ब्लाउज, सुंदर साड्या आणि दागिने खास तयार करण्यात आले.
advertisement
तेजश्रीने या सर्व मेहनतीचे श्रेय निर्मात्यांना दिले. टीव्हीवर काम असले तरी, ते कुठेही तडजोड करत नाहीत, असे तिने सांगितले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 10:30 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
गोव्याच्या किनाऱ्यावर लग्नाचा शाही थाट! पण 44 डिग्रीत शूट करताना तेजश्री प्रधानची झाली वाईट अवस्था, म्हणाली...


