156 धावा करूनही जयस्वाल संघाबाहेर,वैभव सुर्यवंशीच्या जोडीदारने घेतली जागा, कोण आहे खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडतो आहे.त्याने राजस्थान विरूद्धच्या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकलं होतं
Yashasvi Jaiswal News : टीम इंडियाचा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडतो आहे.त्याने राजस्थान विरूद्धच्या सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसऱ्या डावात शतक ठोकलं होतं.या खेळीनंतर तो संघाबाहेर झाला आहे.त्याची जागा आता वैभव सुर्यवंशीचा जोडीदार आयुष म्हात्रेने घेतली आहे.पण यशस्वी जयस्वाल हा संघाबाहेर का गेला?हे जाणून घेऊयात.
यशस्वी आता मुंबईसाठी येणाऱ्या रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आहे. त्याच्या जागी मुंबईने वैभव सूर्यवंशीचा सहकारी सलामीवीर आयुष म्हात्रेची निवड केली आहे. मुंबईचा पुढील रणजी ट्रॉफी सामन्यात हिमाचल प्रदेशशी सामना होईल.या सामन्यात यशस्वी हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळू शकणार नाही. हा सामना शनिवारपासून मुंबईत खेळला जाईल.
advertisement
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यशस्वीला संघाबाहेर का करण्यात आलं आहे. तर यशस्वीला 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची घरच्या मैदानावरची कसोटी मालिका खेळायची असल्याने त्याला सोडण्यात आले आहे. त्यामुळे तो मुंबईसाठी पुढचा सामना खेळू शकणार नाही आहे.
दरम्यान जयपूरमध्ये राजस्थानविरुद्ध ६७ आणि १५६ धावा काढणाऱ्या यशस्वी जयस्वालला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवडण्यात आल्यामुळे त्याला सोडण्यात आले.यशस्वी यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून बेंचवर बसल्यानंतर परतला होता.तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम अकरा जणांमध्ये त्याला स्थान मिळाले नाही.
advertisement
यशस्वी जयस्वालने पहिल्यांदाच विकेट घेतली
यशस्वी जयस्वालने राजस्थानविरुद्धही विकेट घेतली. त्याने दीपक हुड्डाला २४८ धावांवर बाद केले, ही त्याची प्रथम श्रेणीची विकेट होती. हुड्डा जयस्वालच्या गोलंदाजीवर विकेटकीपरने झेलबाद झाला. चेंडूने प्रभाव पाडत यशस्वी जयस्वालने केवळ दीपक हुड्डालाच बाद केले नाही तर दुसऱ्या डावात मुंबईलाही दमदार सुरुवात करून दिली. शतक ठोकून यशस्वीने दाखवून दिले की तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रभाव पाडण्यास सज्ज आहे.
advertisement
मुंबईचा संघ :
view commentsशार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सर्फराज खान, मुशीर खान, आकाश पारकर, शम्स मुलाणी, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसोझा, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक, हरिभन सिंह, हरिभन सिंह, अक्कलवार) कार्तिक मिश्रा, साईराज पाटील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 10:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
156 धावा करूनही जयस्वाल संघाबाहेर,वैभव सुर्यवंशीच्या जोडीदारने घेतली जागा, कोण आहे खेळाडू?


