परदेशातही 'दशावतार'ची गाज! न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला मराठी सिनेमाचा भव्य टीझर

Last Updated:

Dashavataar Teaser in New York Times Square : दशावतार चित्रपटाचा टीझर न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे.  मराठी सिनेसृष्टीसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.  

News18
News18
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतला सर्वांत भव्य चित्रपट म्हणून गाजत असलेला 'दशावतार' चित्रपट महाराष्ट्रापुरता न राहता आता जागतिक स्तरावरही गाजू लागला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात आणि मराठी प्रेक्षकांमध्येच या चित्रपटाची चर्चा रंगली होती. मात्र आता सातासमुद्रापार न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर दशावतार हा सिनेमा झळकला आहे. चित्रपटाचा टीझर न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे.  मराठी सिनेसृष्टीसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.
‘दशावतार’ या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्रातील ऋढी परंपरा, संस्कृती, दमदार कथा आणि आधुनिक सिनेतंत्रातून निर्माण झालेली भव्यता यांचा संगम असलेल्या या चित्रपटामुळे मराठी चित्रपट जागतिक स्तरापर्यंतही झेप घेऊ शकतो याची जाणीव या निमित्ताने झाली आहे. ‘दशावतार’ मराठी अस्मिता आणि परंपरेचा जागतिक सोहळा ठरतोय.
advertisement
"दशावतार ही महाराष्ट्राच्या मातीतली गोष्ट असली तरी त्याचा विषय, त्यातली पात्रं आणि दिसणारा निसर्ग हा वैश्विक स्तरावर सहज आपलासा वाटणारा आहे. आणि त्यातच टाईम्स स्क्वेअरवर टीझर प्रदर्शित होणं ही आमच्या मेहनतीला मिळालेली आंतरराष्ट्रीय दाद आहे. टाईम्स स्क्वेअरवरील झळकलेला टीझर हे त्या जागतिक प्रवासाचं पहिलं पाऊल आहे. आता जगभरातील प्रेक्षक ‘दशावतार’ला कसा प्रतिसाद देतात, हे पाहण्यासाठी आम्ही आतुर आहोत", असं सिनेमाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि झी स्टुडिओ मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी म्हटलं आहे.
advertisement
advertisement
दशावतार चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
गुरु ठाकूर यांचे संवाद गीते आहेत. तर  ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत आणि दमदार निर्मितीमुळे हा चित्रपट एक मोठा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. येत्या 12 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. हा भव्य चित्रपट जगभरातल्या प्रेक्षकांना महाराष्ट्राची, इथल्या भव्य निसर्गाची, ऋढी परंपरांची आणि लोककलांची नव्याने ओळख करुन देणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
परदेशातही 'दशावतार'ची गाज! न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला मराठी सिनेमाचा भव्य टीझर
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement