Train Ticket : सणासुदीच्या काळात कन्फर्म तिकीट हवंय? या पद्धतीनं करता येईल कन्फर्म बुकिंग; वाचा संपूर्ण प्रोसेस
Last Updated:
Diwali Tatkal Ticket Booking : दिवाळीसाठी तिकीट काढायला विसरला आहेत तर काळजी करू नका.IRCTC Tatkal बुकिंगच्या या खास पद्धतीनं काही मिनिटांत तुम्हाला मिळेल कन्फर्म सीट आणि प्रवास होईल टेन्शन-फ्री.
पुणे : सणासुदीच्या दिवसांत लाखो प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. परंतू, इतक्या मोठ्या गर्दीत वेळेत तिकीट मिळवणे अवघड ठरते. अनेक जण महिनाभर अगोदर आरक्षण करून ठेवतात. मात्र, कामाच्या व्यापामुळे काही लोकांना तिकीट काढायचं राहून जातं. अशा वेळी भारतीय रेल्वेची तत्काळ सुविधा तुमच्यासाठी वरदान ठरू शकते.
तत्काळ सुविधा म्हणजे काय?
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या तातडीच्या गरजेसाठी ही सोय सुरू केली आहे. प्रवासाच्या अगदी एक दिवस आधीही तिकीट बुक करता येते. सामान्य आरक्षणात जागा न मिळाल्यास किंवा अचानक प्रवासाची वेळ आल्यास तत्काळ योजना उपयोगी पडते. रेल्वे प्रत्येक गाडीत काही जागा या योजनेंतर्गत खास राखून ठेवते.
तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ
एसी क्लाससाठी बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते.
advertisement
नॉन-एसीसाठी बुकिंग सकाळी 11 वाजता सुरू होते. प्रवाशांनी ही वेळ लक्षात ठेवून तयारी ठेवली तर तिकीट मिळण्याची शक्यता वाढते.
कुठे आणि कसे बुक करावे?
तत्काळ तिकिटे तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरून बुक करू शकता. शिवाय, रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरही ही सुविधा उपलब्ध आहे. मात्र, काउंटरपेक्षा ऑनलाइन बुकिंगद्वारे जास्त तिकिटे जारी होतात. बुकिंग करताना सर्वप्रथम तुमचे IRCTC अकाउंट तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर "Tatkal Booking" पर्यायावर क्लिक करून प्रवासाची तारीख, ट्रेन नंबर, बोर्डिंग आणि डेस्टिनेशन स्टेशन याची माहिती भरावी. उपलब्ध तिकिटांची यादी दिसल्यानंतर प्रवाशांची नावे टाकून पेमेंट करावे. पेमेंटसाठी डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI या पर्यायांचा वापर करता येतो.
advertisement
तिकीट पटकन मिळवण्यासाठी टिप्स...
बुकिंग सुरू होण्याआधीच लॉग-इन करून ठेवा.
प्रवाशांची माहिती आधीच मास्टर लिस्टमध्ये सेव्ह करा, वेळ वाचेल.
चांगल्या गतीचे इंटरनेट कनेक्शन वापरा.
पेमेंटसाठी शक्यतो UPI पर्याय निवडा, कारण कार्ड डिटेल टाकण्यात वेळ जातो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 8:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Train Ticket : सणासुदीच्या काळात कन्फर्म तिकीट हवंय? या पद्धतीनं करता येईल कन्फर्म बुकिंग; वाचा संपूर्ण प्रोसेस