आंदेकर गँगची पोलिसांनी जिरवली, ज्या भागात माज केला तिथेच बंडू आंदेकरला गुडघ्यावर आणलं

Last Updated:

Bandu Andekar: पुणे पोलिसांनी कोमकरच्या आरोपींना चांगलीच अद्दल घडवली आहे. ज्या नानापेठेत बंडू आंदेकर आणि त्याची टोळी दहशत माजवण्याचा प्रयत्न केली तिथेच जिरवली.

bandu andekar
bandu andekar
पुणे : गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगवारचा भडका उडाला. मागील वर्षभरापासून दबा धरून बसलेल्या वनराज आंदेकरच्या टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा खून केला आहे.आंदेकर आणि कोमकर यांच्या संघर्षात नातवाचा बळी गेला. पुणे पोलिसांनी कोमकरच्या आरोपींना चांगलीच अद्दल घडवली आहे. ज्या नानापेठेत बंडू आंदेकर आणि त्याची टोळी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच परिसरात पोलिसांनी बंडू आंदेकरला गुडघ्यावर बसवले आहे. याचा फोटो समोर आला आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 13 पैकी 8 आरोपींना माध्यमांसमोर आणले त्यावेळीचा हा फोटो व्हायरल झाला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना गुडघ्यावर बसवले होते. मात्र बंडू आंदेकरला दोन पायावर बसता येत नव्हते, त्यामुळे तो मांडी घालून खाली बसले. मात्र पुणे पोलिसांनी आंदेकरला गुडघ्यावर बसायला सांगितले, त्यानंतर आंदेकरसह सर्व आरोपींना गुडघ्यावर बसवण्यात आले. त्यामुळे पुण्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
advertisement

आठ आरोपींना अटक

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आठ आरोपींना पुणे पोलीस कोर्टात हजर करण्यात आले. काल रात्री अटक केल्यानंतर आज सहा आरोपींना कोर्टात करण्यात आलं अमन पठाण ,सुजल मेरगु ,बंडू आंदेकर ,स्वराज वाडेकर ,तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर या सहा आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले.

क्लासवरून घरी परतला अन् गोळ्या झाडल्या

advertisement
गणेश कोमकर याची पत्नी कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची मुलगी आहे. ती वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी आहे. वनराजच्या खुनानंतर आंदेकर-कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आंदेकर-कोमकर संघर्षात बंडू आंदेकरच्या नातवाचा बळी गेला. 18 वर्षांचा गोविंद क्लासवरून घरी परतला असताना त्याच्यावर पार्किंगमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या. वनराजचे वडील आणि गोविंदचे आजोबा बंडू आंदेकरानी हत्या घडवून आणल्याचा आयुषचा आईचा आरोप आहे.
advertisement

आजोबा नातवाचा पक्का वैरी

आजोबा हा नातवाचा पहिला दोस्त असतो, आणि नातू हा आजोबाचा शेवटचा दोस्त असल्याचं बोललं जातं. नात्याची खरी जडण घडण तिथूनच होत असते. मात्र इकडे मात्र आजोबा आणि नातवाचं पक्क वैर पाहायला मिळालं. वनराज आंदेकर याचे वडील बंडू आंदेकरांची टोळी पुण्यातील जुन्या टोळींपैकी एक आहे. आंदेकर टोळी आणि माळवदकर या दोन्ही टोळ्यांमध्ये संघर्ष झाला होता. या टोळीयुद्धातून प्रमोद माळवदकर याचा खून झाला होता. त्या प्रकरणात बंडू आंदेकर याला जन्मठेप झाली होती. गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात होता.
मराठी बातम्या/पुणे/
आंदेकर गँगची पोलिसांनी जिरवली, ज्या भागात माज केला तिथेच बंडू आंदेकरला गुडघ्यावर आणलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement