Prasar Bharti Jobs : खुशखबर! प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; पात्रता काय?अर्ज कसा करावा?

Last Updated:

Prasar Bharti Jobs Vacancy 2026: प्रसार भारतीमध्ये 2026 साली मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.

News18
News18
मुंबई  : सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आता तुमच्यासमोर आहे. भारतातील सार्वजनिक प्रसारक संस्था प्रसार भारतीमध्ये मार्केटिंग विभागात नोकरीसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवार prasarbharati.gov.in वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती देशभरातील अनेक ठिकाणी होणार आहे. यामध्ये रायपूर, जालंधर, पाटणा, मुंबई, भोपाळसह अनेक शहरांचा समावेश आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
प्रसार भारतीच्या दूरदर्शन केंद्रे, आकाशवाणी आणि कमर्शियल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसमध्ये या पदांसाठी उमेदवारांची निवड होईल. एकूण 14पदांसाठी ही भरती जाहीर केली गेली आहे. इच्छुकांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2026 आहे,त्यामुळे 15 दिवसांच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. भरती दोन वर्षांच्या करारावर केली जाणार आहे.
पगार आणि फायदे एकत्र जाणून घ्या
पगार शहरानुसार बदलतो. चैन्नई, हैदराबाद, मुंबई आणि कोलकत्तामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 ते 50,000 रुपये पगार मिळणार आहे. इतर शहरांसाठी पगार 35,000 ते 42,000 रुपये आहे.
advertisement
अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए, एमबीए मार्केटिंग किंवा पीजी डिप्लोमा मॅनेजमेंट,मार्केटिंग केलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा. ही नोकरी तुमच्या करिअरसाठी मोठी संधी आहे. इच्छुकांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करणे गरजेचे आहे आणि प्रसार भारतीसारख्या प्रतिष्ठित संस्थेत आपले भविष्यातील करिअर घडवावे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Prasar Bharti Jobs : खुशखबर! प्रसार भारतीमध्ये नोकरीची संधी; पात्रता काय?अर्ज कसा करावा?
Next Article
advertisement
BJP Congress Alliance : पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं जुळणार समीकरण?
पुन्हा भूकंपाचे संकेत! भाजप-काँग्रेस युतीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ, कुठं
  • काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसच्या युतीमुळे मोठी खळबळ उडाली होती.

  • आता पुन्हा एकदा भाजप काँग्रेसची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

  • काँग्रेस किंग मेकरच्या भूमिकेत असल्याने आज मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

View All
advertisement