Weather Alert: महाराष्ट्रावर पुन्हा संकट, कडाक्याच्या थंडीत पावसाचा अलर्ट, पाहा कुठं?

Last Updated:
Weather Alert: जानेवारी महिन्यात पुन्हा हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. राज्यावर पुन्हा अवकाळी संकट घोंघावत असून हवामान विभागाने अलर्ट दिला आहे.
1/4
ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट घोंघावत आहे. जानेवारीच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्यानंतर आता पुन्हा हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज, 12 जानेवारीला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात मात्र कडाक्याची थंडी जाणवेल. सोमवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

advertisement
2/4
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टीत हिवाळा सौम्य स्वरूपात जाणवणार आहे. मुंबई शहरात पहाटे हलका गारवा असला तरी दिवस चढताच हवेत दमटपणा वाढण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असून, मागील दोन दिवसांप्रमाणेच वातावरण स्थिर राहील. ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागांतही आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहणार असून पुढील काही दिवस तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता कमी आहे.

3/4
राज्याच्या अंतर्गत भागांत थंडीचा प्रभाव अधिक ठळक दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान एक अंकी पातळीच्या जवळ पोहोचले आहे. सकाळी धुके आणि बोचरे वारे जाणवू शकतात. मराठवाड्यात पहाटे थंड वातावरण राहील, तर दुपारी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. विदर्भातही थंडीचा जोर कायम असून काही जिल्ह्यांत हुडहुडी वाढण्याची चिन्हे आहेत.

4/4
एकूण परिस्थितीचा विचार करता, राज्यात हवामान कोरडे असले तरी हिवाळ्याचा प्रभाव अजून काही दिवस टिकून राहणार आहे. किनारपट्टीवर सौम्य थंडी आणि दमट हवा, तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता तर विदर्भ मराठवाड्यात कडाक्याची थंडी जाणवणार आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस हवामानाची विचित्र युती पाहायला मिळेल. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.

Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement