advertisement

Pune Crime: शेतात लघुशंका केल्यानं सटकली; मावळमधील तिघांचं व्यक्तीसोबत धक्कादायक कृत्य

Last Updated:

नवनाथ बबन शेटे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवलाख उंब्रे परिसरातील एका शेतात लघुशंका करत होते. याच कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

४० वर्षीय व्यक्तीला मारहाण (AI Image)
४० वर्षीय व्यक्तीला मारहाण (AI Image)
पुणे : मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात शेतात लघुशंका केल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ४० वर्षीय व्यक्तीला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ बबन शेटे (वय ४०) हे गुरुवारी (८ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नवलाख उंब्रे परिसरातील एका शेतात लघुशंका करत होते. यावेळी शेतात लघुशंका केल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले आणि तिन्ही आरोपींनी मिळून नवनाथ शेटे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
advertisement
याप्रकरणी पोलिसांनी राहुल भगवान शेटे (वय ३८), प्रमोद भगवान शेटे (३५) आणि रुद्राक्ष काळुराम शेटे (वय १८) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी नवलाख उंब्रे येथीलच रहिवासी आहेत.
मारहाण झाल्यानंतर नवनाथ शेटे यांनी शुक्रवारी (९ जानेवारी) पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
advertisement
पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सिग्नलला थांबलेल्या रिक्षाचालकाला जबरदस्तीने दुसऱ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली आणि यानंतर लुटण्यात आलं. ही घटना शुक्रवारी रात्री मोशीतील बोऱ्हाडे वस्ती येथे घडली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: शेतात लघुशंका केल्यानं सटकली; मावळमधील तिघांचं व्यक्तीसोबत धक्कादायक कृत्य
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement