Kalyan News : धक्कादायक! एका शब्दानं डोकं फिरलं, रेल्वे प्लॅटफॉर्मवरच प्रवाशाच्या डोक्यात घातली फरशी
Last Updated:
kalyan Railway Station Incident : एक्सप्रेसमध्ये मोठ्या आवाजात मोबाईल गाणी वाजवण्यावरून झालेल्या वादातून कल्याण रेल्वे स्थानकात एका प्रवाशावर हल्ला झाला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण : प्रवास करताना अनेकदा सह प्रवाशाची वादही होत असतात आणि हे वाद काही वेळात शांत होतात. पण कल्याणमधून यासंबंधित एक धक्कादायक वाद समोर आला आहे पण पुढे या वादाचे रुपांतर थरारक मारहाणीत झाले आहे.नेमका वाद काय होता आणि कशावरुन झाला हे जाणून घ्या.
'आवाज कमी कर' एवढंच म्हणाला अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळची वेळ असल्याने प्रवासादरम्यान शांतता राखावी अशी विनंती एका प्रवाशाने शेजारी बसलेल्या सहप्रवाशाला केली. तो सहप्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावत होता. मात्र हे त्याला आवडले नाही.'माझ्या मोबाईलचा आवाज कमी करायला सांगणारा तू कोण आहेस?' असे म्हणत त्याने असे सांगणाऱ्या प्रवाशाशी वाद घातला. हा प्रकार इंदौर-दौंड एक्सप्रेसमध्ये घडला.
advertisement
प्लॅटफॉर्मवरच प्रवाशावर फरशीचा हल्ला
प्रवास सुरू असतानाच दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढत गेला. इतर प्रवाशांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईलवर गाणी वाजवणारा प्रवासी अधिकच चिडला. ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचताच आवाज कमी कर असं सांगणारा प्रवासी खाली उतरला. त्याच वेळी मोबाईलचा आवाज जास्त करणारा प्रवासी ही खाली उतरला आणि फलाटावर ठेवलेली फरशीचा तुकडा उचलला आणि थेट त्या प्रवाशाच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात तो प्रवासी गंभीर जखमी झाला आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्राव झाला.
advertisement
घटनेनंतर जखमी प्रवाशाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल सोनावणे (वय 32) असे जखमी आणि तक्रारदार प्रवाशाचे नाव आहे. तर मोठ्या आवाजात मोबाईलवर गाणी वाजवणाऱ्या तरुणाचे नाव हर्षद सुदाम मोरे (वय 24) असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिस तपासात हर्षद मोरे हा सफाई कामगार असल्याचे समोर आले आहे. राहुल सोनावणे यांना गंभीर दुखापत केल्याप्रकरणी हर्षद मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 8:02 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News : धक्कादायक! एका शब्दानं डोकं फिरलं, रेल्वे प्लॅटफॉर्मवरच प्रवाशाच्या डोक्यात घातली फरशी










