advertisement

IPL 2026 : इंटरनॅशनल खेळाडूला विष देऊन मारलं, पत्नीवर संशय... आता त्यांचाच मुलगा मुंबई इंडियन्सकडून खेळणार!

Last Updated:

आयपीएल 2026 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या एका ऑलराऊंडरच्या आयुष्याची धक्कादायक कहाणी समोर आली आहे.

इंटरनॅशनल खेळाडूला विष देऊन मारलं, पत्नीवर संशय... आता त्यांचाच मुलगा मुंबई इंडियन्सकडून खेळणार!
इंटरनॅशनल खेळाडूला विष देऊन मारलं, पत्नीवर संशय... आता त्यांचाच मुलगा मुंबई इंडियन्सकडून खेळणार!
मुंबई : आयपीएल 2026 च्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. मोसमाचा पहिला सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होईल, तर 29 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात होणार आहे. पण त्याआधीच मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या एका ऑलराऊंडरच्या आयुष्याची धक्कादायक कहाणी समोर आली आहे. या खेळाडूचे वडील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, पण त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आणि या मृत्यूचे आरोप थेट पत्नीवर झाले.
1992 साली दक्षिण आफ्रिकेच्या टीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं, तेव्हा एलन डोनाल्डसोबत खांद्याला खांदा लावून टर्शियस बॉश नावाचा खेळाडू फास्ट बॉलिंग करत होता. टर्शियस बॉशने 1992 साली दक्षिण आफ्रिकेकडून एकमेव टेस्ट आणि 2 वनडे खेळल्या, पण 2000 साली वयाच्या फक्त 33 व्या वर्षी टर्शियस बॉशचा मृत्यू झाला. टर्शियस बॉशच्या मृत्यूचं अधिकृत कारण गुइलेन-बॅरे सिंड्रोम सांगण्यात आलं, जो एक दुर्लभ न्यूरोलॉजिकल आजार आहे, पण बॉश यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला नाट्यमय वळण लागलं.
advertisement

विष प्रयोगाचा संशय

टर्शियसच्या मृत्यूनंतर त्याची बहिण रीता व्हॅन व्हेटनने हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय व्यक्त केला, त्यामुळे मृत्यूच्या 18 महिन्यांनंतर टर्शियस यांचा पुरलेला मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला आणि त्याचा फॉरेन्सिक तपास केला गेला. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आर्सेनिक किंवा मरक्युरी सारख्या धातूंचा वापर करून टर्शियस बॉश यांना विष दिल्याचे संकेत मिळाले. टर्शियस यांची पत्नी करेन-ऐनी यांचे दुसरे सहकारी वकील हेन्री सेल्जर यांच्यातही टर्शियससारखीच लक्षणं आढळली, ज्यामुळे संशयाची सुई आणखी वाढली.
advertisement
मृत्यूआधी टर्शियस यांनी एक गुप्त मृत्यूपत्र लिहिलं होतं, ज्यात त्यांनी पत्नीला संपत्तीमधून बेदखल करत संपूर्ण संपत्ती मुलगा कॉर्बिन बॉशच्या नावावर केली. टर्शियसचा मृत्यू झाला तेव्हा कॉर्बिन बॉश केवळ 5 वर्षांचे होते. वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कॉर्बिनने दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियनमध्ये क्रिकेट करिअरला सुरूवात केली, जिथून त्याचे वडीलही खेळायचे. टर्शियस बॉश यांनी 1992 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तर कॉर्बिन बॉशने 2024 साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं.
advertisement

T20 वर्ल्ड कपमध्ये खेळला बॉश

वडिलांच्या मृत्यूच्या 26 वर्षांनंतर कॉर्बिन बॉश दक्षिण आफ्रिकेची जर्सी घालून 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला. बॉशने युएईविरुद्ध 3 विकेट घेऊन टीमच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही बॉश खेळला. आता कॉर्बिन बॉश आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे.
टर्शियस बॉशच्या मृत्यूचं गूढ अजूनही पूर्णपणे उकलेलं नाही. टर्शियसच्या पत्नीवर विष प्रयोग करून हत्येचा आरोप झाला, पण अजूनही हे आरोप कोर्टामध्ये सिद्ध झालेले नाहीत, पण या प्रकरणामुळे क्रीडा विश्वात खळबळ माजली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : इंटरनॅशनल खेळाडूला विष देऊन मारलं, पत्नीवर संशय... आता त्यांचाच मुलगा मुंबई इंडियन्सकडून खेळणार!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement