Mumbai News: दबक्या पाऊलाने सोसायटीत आला अन् कुत्र्याची केली शिकार, अंगावर शहारे आणणारा CCTV VIDEO
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
दिंडोशीतल्या एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये बिबट्याचे दर्शन झाले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नागरिकांच्या अंगावर शहारे आले आहेत.
मुंबई: मुंबईमध्ये बिबट्या दिसणे ही एक सर्वसामान्य बाब झाली आहे. आता अशातच मुंबईतल्या दिंडोशी परिसरातील रहिवाशांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. दिंडोशीतील 'रहेजा हाईट्स कॉम्प्लेक्स'मध्ये बिबट्याचे दर्शन झाले आहे. 17 मार्च 2026 रोजी, पहाटेच्या सुमारास या हाय प्रोफाईल सोसायटीच्या परिसरामध्ये बिबट्या आढळून आला आहे. खरंतर, बिबट्या सोसायटीमध्ये आला असल्याचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका युजरने आपल्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्याने व्हिडिओ शेअर करताच पुन्हा एकदा बिबट्याची चर्चा सुरू झाली आहे.
सूरज नुरानी नावाच्या एका एक्स युजरने त्याच्या एक्स अकाऊंटवर 'रहेजा कॉम्प्लेक्स'मध्ये बिबट्या आढळल्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. "मुंबईमध्ये 17 मार्च रोजी पहाटेच्यावेळी दिंडोशीतल्या 'रहेजा हाइट्स कॉम्प्लेक्स'च्या या गेटेड कम्युनिटीमध्ये बिबट्या शिरला होता. तुम्ही पाहू शकता, व्हिडिओ क्लिपमध्ये बिबट्या एका कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे." असं कॅप्शन देत त्यांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे. व्हायरल होत असलेल्या ह्या व्हिडिओमध्ये, रहेजा हाईट्सच्या परिसरातील एका कुत्र्याला बिबट्या पकडून नेत असतांना नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या कुत्र्याला सोडून पळून गेला, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.
advertisement
#Mumbai- Leopard entered a Dindoshi housing society- Raheja Heights Complex a gated community with 675 flats, on the wee hours on March 17. The clip shows the leopard mauling a dog. pic.twitter.com/06QFXaUAOa
— Siraj Noorani (@sirajnoorani) March 18, 2026
advertisement
दिंडोशीच्या आधी मुलुंडमध्येही बिबट्याचे दर्शन झाले होते. मुलुंडमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या एका परिसरात, निवासी सोसायटीमध्ये बिबट्या दिसल्याच्या घटनेनंतर सुमारे महिनाभराने दिंडोशीमध्येही बिबट्या आढळला आहे. ज्यामुळे मुंबईकरांमध्ये चिंता निर्माण होताना दिसत आहे. वन अधिकाऱ्यांनी मुलुंडमध्ये तातडीने कारवाई केली होती. दरम्यान, आता मुंबईमध्ये बिबट्याचा वावर वाढल्यामुळे वनविभागाने काही उपाययोजना आखायला हव्या आहेत. दिंडोशीमध्ये बिबट्याचा वावर दिसल्यानंतर स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे गणेश नाईक यांच्याकडे बिबट्यासंबंधित ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मुंबईमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याच्या घटनांमुळे रहिवाशांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 6:36 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: दबक्या पाऊलाने सोसायटीत आला अन् कुत्र्याची केली शिकार, अंगावर शहारे आणणारा CCTV VIDEO









