advertisement

Gudi Padwa 2026 : यायला लागतंय! या आहेत मुंबई आणि ठाण्यात 5 मोठ्या शोभायात्रा, एकदा सामील झालं पाहिजे!

Last Updated:
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई आणि आसपासच्या भागात निघणाऱ्या शोभायात्रा म्हणजे मराठी संस्कृतीचा जिवंत उत्सवच असतो. विशेषतः गिरगाव, दादर, ठाणे, डोंबिवली आणि कुर्ला. या भागात निघणाऱ्या शोभायात्रा शहराला अक्षरशः रंग, संगीत आणि संस्कृतीने सजवून टाकतात. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि लेझीम पथकं यामुळे प्रत्येक रस्ता सणमय होतो.
1/5
गिरगाव येथील शोभायात्रा ही परंपरेची खरी ओळख करून देणारी आहे. अरुंद रस्त्यांमधून निघणारी ही मिरवणूक नऊवारी साड्या, फेटे, लेझीम, ढोल-ताशांच्या गजरात पुढे सरकत असते. प्रत्येक कोपऱ्यावरून गुढी पाडव्याच्या शुभेच्छाचा जयघोष ऐकू येतो आणि एक वेगळाच उत्साह वातावरणात भरून राहतो.

2/5
दादरमधील शोभायात्रा ही पारंपरिकतेसोबतच सांस्कृतिक वैविध्य दाखवणारी असते. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात कलाकार, ऐतिहासिक देखावे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या पाट्या पाहायला मिळतात. दादरचा मराठी संस्कृतीशी असलेला जवळचा संबंध या मिरवणुकीत स्पष्ट जाणवतो आणि ढोल-ताशांच्या तालावर सगळं वातावरण भारलेलं असतं.

3/5
ठाणे येथील शोभायात्रा मात्र भव्यतेसाठी ओळखली जाते. इथे पारंपरिक आणि आधुनिक सादरीकरणाचा सुंदर मिलाफ दिसतो. मोठ्या रस्त्यांवरून निघणाऱ्या या मिरवणुकीत आकर्षक झाक्या, लाईव्ह परफॉर्मन्स आणि संध्याकाळच्या प्रकाशात उजळलेलं दृश्य मन मोहून टाकतं. कुटुंबासोबत शांतपणे आणि आरामात हा उत्सव अनुभवता येतो.

4/5
कुर्लामधील शोभायात्रा ही विविधतेने नटलेली आणि ऊर्जेने भरलेली असते. इथे वेगवेगळ्या समुदायांचा सहभाग दिसतो आणि ढोल-ताशांसोबतच आधुनिक संगीताचाही तडका अनुभवायला मिळतो. तरुणाईचा जोश, रंगीबेरंगी वातावरण आणि सणाचा उत्साह यामुळे कुर्ल्याची मिरवणूक खूपच जिवंत आणि एन्जॉयमेंटने भरलेली वाटते.

5/5
डोंबिवलीची शोभायात्रा शिस्त आणि सांस्कृतिक समृद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे सहभागी होणाऱ्या लोकांचा उत्साह जितका मोठा असतो तितकीच शिस्तही जाणवते. पारंपरिक नृत्य, संस्कृती जपणारे सादरीकरण आणि महिलांचा मोठा सहभाग या मिरवणुकीला एक वेगळीच ओळख देतो.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement