HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ऑनलाइन डाऊनलोड कसं कराल हॉल तिकीट? जाणून घ्या

Last Updated:

HSC 12th Board Exam Online Hall Ticket Download : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्डाने आजपासून बारावी परीक्षेचे ऑनलाईन हॉल तिकीट उपलब्ध करून दिले आहे.

News18
News18
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांसाठी हॉल तिकीट आजपासून म्हणजेच 12 जानेवारी 2026 पासून उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बारावीची लेखी परीक्षा ही 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून ती 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे.
हॉल तिकीट मिळणार कसे?
मंडळाच्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहेत. मात्र, ही हॉल तिकीटे थेट विद्यार्थ्यांनी डाउनलोड करायची नसून संबंधित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनीच ती डाउनलोड करायची आहेत. त्यानंतर हॉल तिकीटांचे प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना वितरित करायचे आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन हॉल तिकीट देण्यात येणार असून यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.
advertisement
हॉल तिकीत घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
शाळा किंवा ज्युनिअर कॉलेजने दिलेल्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही आणि अधिकृत शिक्का असणे बंधनकारक आहे. फोटो असलेल्या हॉल तिकिटावर सही आणि शिक्का नसल्यास ते हॉल तिकीट वैध मानले जाणार नाही असे मंडळाने स्पष्ट केले आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना हॉल तिकीट सोबत ठेवणे आवश्यक आहे. हॉल तिकीट नसल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही.
advertisement
हॉल तिकीट कसे डाऊनलोड करावे?
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी शाळा किंवा महाविद्यालयांनी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाईट www.mahahsscboard.inउघडावी. त्यानंतर होमपेजवरील 'HSC Hall Ticket 2026' या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून लॉगिन करावे. स्क्रीनवर दिसणारे हॉल तिकीट नीट तपासून त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यावी.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ऑनलाइन डाऊनलोड कसं कराल हॉल तिकीट? जाणून घ्या
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement