Laptop चार्जिंगला लावून कधीच करु नका ही 5 कामं! पहिलं काम तर सर्वच करतात
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Laptop care tips: आजच्या काळात कॉलेज असो वा ऑफिस लॅपटॉप महत्त्वाचा झाला आहे. अभ्यासापासून एंटरटेनमेंटपर्यंत लॅपटॉप खुप महत्त्वाचा झालाय.
Laptop: सध्याच्या काळात लॅपटॉपवर आपली खुप काम होतात. ऑफिसची काम होतातच, यासोबतच कॉलेजचा अभ्यास आणि एंटरटेनमेंटसाठीही आपण लॅपटॉपचा वापर करतो. पण काही लोक तासंतास लॅपटॉप चार्जिंगवर लावून वापर करत राहतात. पण त्यांना अंदाज येत नाही की, काही सवयी ही डिव्हाइसची बॅटरी आणि परफॉर्मेंस दोन्हीलाही नुकसान पोहोचवत असते. विशेष म्हणजे यामधून पहिलं काम हे प्रत्येक यूझर करत असतो. तुम्हाला वाटत असेल की, लॅपटॉपची दीर्घकाळ नवाकोरा राहावा तर काही गोष्टी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
चार्जिंग करताना जास्त गेमिंग किंवा एडिटिंग करणे : लॅपटॉप चार्जिंग करताना हाय-ग्राफिक्स गेम खेळणे किंवा व्हिडिओ एडिटिंग सारखी जड कामे करणे ही एक सामान्य सवय आहे. यामुळे प्रोसेसर आणि ग्राफिक्स कार्डवर खूप ताण येतो, ज्यामुळे लॅपटॉप जलद गरम होतो. सतत जास्त गरम केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते आणि हार्डवेअरच्या परफॉर्मेंसवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









