आजपासून ट्रेन तिकीटाच्या नियमांमध्ये बदल! पाहा याचा प्रवाशांना काय फायदा होणार
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतीय रेल्वेने 12 जानेवारीपासून ट्रेन तिकीटांच्या नियमात क्रांतीकारी बदल केला आहे. आता फक्त आधार-व्हेरिफाइड IRCTC यूझर्सच अडव्हान्स रिझर्व्हेशन पीरियड ओपन होण्याच्या दिवशी तिकीट बुकिंग करु शकतील. महत्त्वाचे म्हणजे, सकाळी 8 ते दुपारी 12 ही वेळ मर्यादा आता काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हाला मध्यरात्रीपर्यंत तिकिटे बुक करता येतील. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयानंतर, सामान्य प्रवाशांना कन्फर्म सीट मिळण्याची आशा किती वाढली आहे? दलालांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेने किती बदल केले आहेत ते जाणून घ्या.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने नवीन वर्षात सर्वसामान्य प्रवाशांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आजपासून ट्रेन तिकीट बुकिंगची पूर्ण व्यवस्था बदलण्यात आली आहे. आज म्हणजेच 12 जानेवारी 2026 पासून रेल्वेच्या ई-तिकिटिंग म्हणजेच ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये आयआरसीटीसीने 10 मोठे बदल केले आहेत. या बदलांनंतर आशा केली जातेय की, आता दलालांना अनाधिकृत एजंटची कारभार ठप्प होणार आहे. आता सॉफ्टवेअरद्वारे काही मिनिटांत कन्फर्म तिकिटे काढून घेणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाईल.
advertisement
advertisement
पूर्वी, आधार-व्हेरिफायड यूझर फक्त अॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (एआरपी) उघडण्याच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंतच तिकिटे बुक करू शकत होते. एजंट सामान्य लोकांसाठी जागा बुक करण्यासाठी या अरुंद चार तासांच्या वेळेचा फायदा घेण्यासाठी त्यांच्या कनेक्शनचा वापर करत होते. मात्र, आजपासून ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. आधार-व्हेरिफाय प्रवाशांना आता एआरपी उघडण्याच्या दिवशी सकाळी 8 ते मध्यरात्रीपर्यंत वेळ असेल. याचा अर्थ असा की तुम्हाला तिकीट बुक करण्यासाठी सकाळी लवकर सर्व्हर हँगअप किंवा स्लो इंटरनेट स्पीडचा सामना करावा लागणार नाही.
advertisement
दलालांवर जोरदार हल्ला : रेल्वेने स्पष्ट केले आहे की 12 जानेवारी 2026 पासून, एआरपीच्या पहिल्या दिवशी, ज्यांचे अकाउंट आधारशी जोडलेले आहे त्यांनाच ऑनलाइन आरक्षण करण्याची परवानगी दिली जाईल. आधार-व्हेरिफाय नसलेले यूझर एआरपीच्या पहिल्या दिवशी पोर्टलवर बुकिंग करू शकणार नाहीत. ई-तिकीटिंग सिस्टमचा गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. दलाल अनेकदा बनावट आयडी आणि बनावट ईमेल अॅड्रेसचा वापर करून हजारो अकाउंट तयार करतात. आधार अनिवार्य असल्याने, आता प्रत्येक तिकीट खऱ्या व्यक्तीच्या ओळखीशी जोडले जाईल. यामुळे 'बॉट्स' आणि ऑटोमेशन सॉफ्टवेअरद्वारे केलेल्या बुकिंगला आळा बसेल.
advertisement
5.73 कोटी संशयित अकाउंट्सवर करण्यात आली कारवाई : रेल्वे मंत्रालयाने आपले तंत्रज्ञान एवढे वाढवले आहे की, ते संशयित अॅक्टिव्हिटी लगेच ओळखत आहे. नुकत्याच केलेल्या एका मोठ्या कारवाईमध्ये रेल्वेने 5.73 कोटी संशयित आणि निष्क्रिय IRCTC यूझर अकाउंट्सला एकतर नेहमीसाठी बंद केले आहे किंवा मग अस्थायी रुपाने निलंबित केले आहे. हे ते अकाउंट होते, ज्यामुळे असामान्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात बुकिंग केली जात होती. तसंच जे दीर्घकाळापासून संशयास्पद अॅक्टिव्हिटीचे भाग होते. डेटाबेस पूर्णपणे स्वच्छ राहावा आणि फक्त खऱ्या प्रवाशांनाच लॉगिन करण्यास प्राधान्य मिळावे यासाठी ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे.
advertisement
तेव्हा आणि आता काय बदलले आहे? : जुन्या प्रणालीमध्ये आधार व्हेरिफिकेशनची व्याप्ती खूपच मर्यादित होती. सुरुवातीला, ती फक्त बुकिंगच्या पहिल्या 15 मिनिटांसाठी लागू केली जात होती, नंतर ती सकाळी 10 वाजेपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, नवीन नियमांनुसार, संपूर्ण पहिला दिवस फक्त आधार-व्हेरिफाय यूझर्ससाठीच राखीव आहे. पूर्वी, सामान्य प्रवाशांना भीती होती की जर 8:05 पर्यंत तिकिटे बुक केली गेली नाहीत तर दलाल सर्व जागा घेतील. आता दलाल बनावट आधार कार्ड तयार करणे अशक्य होईल, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना कन्फर्म बर्थ मिळण्याची शक्यता 40% वाढली आहे.
advertisement
काउंटर बुकिंगवर काय परिणाम होईल? : रेल्वेने स्पष्ट केले आहे की, संगणक-आधारित पीआरएस काउंटरवरील तिकीट प्रक्रियेत कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीसारखाच फॉर्म भरून तिकिटे खरेदी करता येतात. हे नवीन नियम प्रामुख्याने ऑनलाइन बुकिंग आणि मोबाइल अॅप यूझर्ससाठीच आहेत, जिथे फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. खरंतर, काउंटरवर ओळखपत्राच्या पुराव्याची मागणी आता रँडम पद्धतीने वाढू शकते.








