Astrology: खूप काळ संधीची वाट पाहिली! आता या राशींचे पालटणार नशीब; प्रयत्नांना तिहेरी ग्रहांची साथ
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, September 10, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊ या.
मेष (Aries) - मेष राशीच्या लोकांकडे आज भरपूर ऊर्जा व उत्साह असेल, त्यामुळे आव्हानांत्मक कामं तुम्ही सहजपणे हाताळू शकाल. तुमच्या अंतर्ज्ञानावर इतर कशाहीपेक्षा जास्त विश्वास ठेवा आणि त्यानुसार पुढे जा. आर्थिक लाभ मिळू शकतात, पण अविचारी खर्च टाळा. एकमेकांवर टीका करण्याऐवजी चांगला संवाद साधून तुम्ही मित्रमंडळींसोबतचे नातेसंबंध मजबूत करू शकता. कोणतंही वचन देण्याआधी सल्ला घ्या. ऊर्जा टिकवण्यासाठी थोडी विश्रांतीही घ्या. तुमच्या नित्यक्रमात काही नव्या गोष्टींचा समावेश करा.LUCKY Color – BlueLUCKY Number - 15
advertisement
वृषभ (Taurus) - कामांसाठी दिवस चांगला आहे. सहकारी व वरिष्ठांच्या बाबतीत संयम ठेवा. ध्येय गाठण्यासाठी भागिदारी व सांघिक कामावर लक्ष द्या. आर्थिक स्थिरता लाभू शकते. मित्रमंडळींना जेव्हा लागेल तेव्हा आधार द्या. गुंतवणुकीच्या कोणतेही निर्णय घेण्याआधी नीट अभ्यास करा व चांगला परिणाम साधण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुम्हाला आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टींना प्राधान्य द्या. भविष्यातील समस्या टाळण्यासाठी संतुलित आहार घ्या.LUCKY Color - BronzeLUCKY Number - 7
advertisement
मिथुन (Gemini) - आज दिवस चांगला आहे. तुमची अनुकूलता आणि पटकन विचार करण्याची वृत्ती तुम्हाला आव्हानं हाताळण्यासाठी उपयोगी पडेल. नवीन कल्पना आणि सहयोग यांचा स्वीकार करा. आर्थिक नियोजन करताना बजेटवर अधिक भर द्या. दीर्घकालीन लाभासाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा. नव्या व्यक्तींना भेटण्यासाठी व तुमचं नेटवर्क मजबूत करण्यासाठी सामाजिक कामांमध्ये सहभागी व्हा. खरा व मोकळा संवाद साधून मैत्रीचं नातं दृढ करा. ताण व्यवस्थापन व काही सजग कृती करून मानसिक आरोग्य जपा. थोडी विश्रांती घेतली तर ताजंतवानं वाटेल.LUCKY Color – OrangeLUCKY Number - 3
advertisement
कर्क (Cancer) - आज एकट्यानं निर्णय घेताना तुमच्या अंतर्ज्ञानाकडे लक्ष द्या. कदाचित वरिष्टांचं तुमच्यावर लक्ष असेल, त्यामुळे सहकाऱ्यांशी सहयोग करून काम करा. आर्थिक बाबतीत संतुलित दृष्टिकोन राखा. अतिखर्च टाळा आणि खूप जास्त गुंतवणूक करण्याऐवजी योग्य व चांगल्या पद्धतीनं गुंतवणूक करा. जुन्या मित्रमंडळींना भेटा. त्यांच्या बाबतीत करुणा दाखवून आधार द्या. अविचारी निर्णय घेताना सावध राहा. वचन देण्याआधी नीट अभ्यास करा व तज्ज्ञांचा सल्ला घ्या. भावनिक आरोग्य राखण्यासाठी स्वतःची काळजी घ्या.LUCKY Color – YellowLUCKY Number - 50
advertisement
सिंह (Leo) - आज बुधवारी तुमची नेतृत्वकौशल्य आज चमकतील. त्यामुळे तुम्ही इतरांना प्रेरित कराल. आव्हानांचा सामना आत्मविश्वासानं करा. तुमच्या मित्रमंडळींची कामगिरी व यश साजरं करा. गुंतवणुकीबाबत कोणतेही निर्णय़ घेण्याआधी वरिष्ठांकडून सल्ला घ्या. तुमच्या दीर्घकालीन उद्दीष्टांशी ताळमेळ राखणाऱ्या स्थिर वचनबद्धतेवर भर द्या. मानसिक व शारीरिक अशा दोन्ही आरोग्याकडे लक्ष द्या. ताण कमी करण्याच्या पद्धती व आनंद देणाऱ्या गोष्टी करा.LUCKY Color – Neon GreenLUCKY Number - 22
advertisement
कन्या (Virgo) - आज जोडीदाराचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकाव तुमच्या गरजा त्यांना सांगा. बारीकसारीक तपशिलांकडे लक्ष देणं व नेटकेपणा या गोष्टी यश मिळवून देऊ शकतात. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रीत करा आणि अनावश्यकपणे विचलित होऊ नका. चांगल्या योजना तयार करून आर्थिक स्थिरता मिळवा. विश्वासार्ह व आधार देणारा मित्र बना. मित्रांचं म्हणणं ऐका व गरज पडेल तेव्हा त्यांना सल्ला द्या. काही नवीन गोष्टींच्या साह्यानं तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. एकंदर आरोग्य जपण्यासाठी स्वतःची काळजी घ्या.LUCKY Color – MustardLUCKY Number - 14
advertisement
तूळ (Libra) - काही जुने किंवा सध्याचे वाद मिटवण्यासाठी प्रामाणिक संवाद ठेवा. कामाच्या ठिकाणी सगळ्यांशी सहकार्यानं आणि मुत्सद्देगिरीनं वागा. सर्जनशीलता स्वीकारा आणि नव्यानं उद्भवणाऱ्या समस्यांवर काही वेगळे उपाय शोधा. तुमच्या खर्चाचं योग्य पद्धतीनं व्यवस्थापन करा. प्रगती व स्थैर्यासाठी संधी शोधा. सक्रियतेनं ऐकून व आधार देऊन अर्थपूर्ण नाती जोडा. नाती दृढ करण्यासाठी सामाजिक गोष्टींच्या योजना बनवा. गुंतवणुकीच्या संधींबाबत सावध राहा. दीर्घकालीन उद्दीष्टांसाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणा. शारीरिक व भावनिक आरोग्यामध्ये समतोल राखा. साधी जीवनशैली राखण्यासाठी विश्रांती मिळवून देणाऱ्या कृती करा.LUCKY Color – CrimsonLUCKY Number - 9
advertisement
वृश्चिक (Scorpio) - आज बुधवारी आव्हानांचा सामना करण्यासाठी तुमच्या आंतरिक शक्तीवर व निष्ठेवर विश्वास ठेवा. दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष द्या आणि धोरणात्मक नियोजन करा. जोखीम व बक्षीस यांचं विश्लेषण करून योग्य आर्थिक निर्णय घ्या. निष्ठा व विश्वासाच्या आधारे मैत्रीची नाती घट्ट करा. मित्रमंडळींना तुमचा आधार द्या. गुंतवणुकीच्या संधींबाबत सखोल अभ्यास करा. छोट्या व दीर्घकालीन लाभांचा विचार करून निर्णय घ्या. ताण कमी करणाऱ्या व आराम वाटेल अशा गोष्टी करा.LUCKY Color – TanLUCKY Number - 24
advertisement
धनू (Sagittarius) - आज कामाचा दिवस आहे, नव्या संधी स्वीकारून प्रगतीसाठीच्या योजना बनवा. तुमच्या आशावादामुळे प्रयत्नांना यश येईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. सकारात्मकता व प्रेरणेचा स्रोत बनून मैत्री जोपासा. काही सामाजिक मेळावे आयोजित करून नाती दृढ करा. गुंतवणुकीच्या संधींबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि सखोल विश्लेषण करा. जोखीम कमी करण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओत विविधता आणा. संतुलित जीवनशैली अंगिकारा.LUCKY Color – GreyLUCKY Number - 49
advertisement
मकर (Capricorn) - आज बुधवारी तुमची मेहनत व चिकाटी याचं अनुकूल फळ मिळेल. आर्थिक बाबतीत हात राखून ठेवा. आर्थिक नियोजन चोख करून कुटुंबातील व्यक्तींनाही विशेषतः मुलांना ते पाळण्यासाठी प्रोत्साहित करा. मित्रमंडळींच्या निष्ठेचं कौतुक करा. गुंतवणूक करताना सावध राहा. नीट अभ्यास करा व तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन मग निर्णय घ्या. काम आणि आराम यांच्या समतोल साधा. खूप थकवा टाळण्यासाठी स्वतःच्या काळजीला प्राधान् द्या.LUCKY Color – LavenderLUCKY Number - 12
advertisement
कुंभ (Aquarius) - आज बुधवारी नात्यामध्ये एकमेकांच्या दृष्टिकोनांचा आदर करा व प्रामाणिक संवाद ठेवा. नावीन्यता व चौकटीबाहेरचा विचार करा. तुमच्या वेगळ्या कल्पना तुम्हाला यश व ओळख मिळवून देतील. व्यावहारिक आर्थिक नियोजन करून आर्थिक स्थिरतेवर भर द्या. काही बौद्धिक चर्चांमध्ये सहभागी व्हा. भविष्यातील गुंतवणुकीच्या संधींचं योग्य विश्लेषण करा. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमच्या मनाला उत्तेजना देणाऱ्या गोष्टी करून मानसिक आरोग्य जपा. काम व आराम यांच्यातला समतोल साधा.LUCKY Color – VioletLUCKY Number - 8
advertisement
मीन (Pisces) - कामाच्या संधी बुधवारी मिळतील. ऊर्जेचा वापर करून तुमच्या कल्पनाशक्तीला भरारी घेऊ द्या. तुम्ही काही काळ विचार करत असलेल्या एखाद्या व्यक्तीसोबत कामाच्या बाबतीत सहयोग करा. आर्थिक शिस्त बाळगा आणि स्वतःसाठी नियम करा. बचतीला प्राधान्य द्या. सहृदय व समजूतदार मित्र बना. कोणतंही वचन देण्याआधी अभ्यास करा व तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आराम देणाऱ्या व आंतरिक शांतता मिळवून देणाऱ्या गोष्टी करा. भावनिक समतोल राखण्यासाठी स्वतःची काळजी घ्या.LUCKY Color – RedLUCKY Number - 19


