Bigg Boss 19 : प्रणित मोरे आला पुन्हा, सलमान खानने 2 स्पर्धकांना दाखवला बाहेरचा रस्ता
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pranit More Bigg Boss 19 : प्रणित मोरे डेंग्यूमधून बरा होऊन बिग बॉस 19 मध्ये परतला. सलमान खानने त्याला स्पेशल पावर दिली. प्रणित मोरेची घरात पुन्हा एन्ट्री होताच दोन स्पर्धक घरातून आऊट झाले आहेत.
स्टँडअप कॉमेडियन मराठमोळा प्रणित मोरे मागच्या आठवड्यात डेंग्यू झाल्यामुळे बिग बॉस 19 च्या घरातून बाहेर गेला. प्रणित बिग बॉस 19मधून आऊट झाला असं म्हटलं गेलं होतं. पण त्याला मेडिकल रुममध्ये औषधोपचारांसाठी ठेवण्यात आलं होतं. तो डेंग्यूमधून रिकव्हर झाल्यानंतर त्याला त्याने पुन्हा घरात एन्ट्री घेतली. प्रणित मोरेची बिग बॉस 19 च्या घरात री एन्ट्री होताच स्पर्धकांना मोठा शॉक बसला आहे. कारण प्रणित मोरेची घरात एन्ट्री होताच शोमधून दोन स्पर्धकांची एक्झिट झाली आहे. इतकंच नाही तर सलमान खानने प्रणित मोरेला एक स्पेशल पावर देखील दिली आहे.
विकेंड का वारची सुरुवात क्रिकेटर झूलन गोस्वामी आणि अंजुम चोप्रा यांच्या एन्ट्रीने झाली. सलमानने दोगांना वल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सलमान खानने अभिषेकवर तान्या मित्तलबरोबर फ्लर्ट करण्याचा आरोप केला. अभिषेकची चांगलीच शाळा घेतली. शेवटी विकेंड का वारला दोन स्पर्धक घरातून बाहेर गेले.
advertisement
या आठवड्यात बिग बॉस 19मध्ये डबल इविक्शन करण्यात आलं. मागील आठवड्यात गौरव खन्ना, अभिषेक बजाज, अनशूर कौर, फरहाना भट्ट आणि नीलम गिरी हे स्पर्धक नॉमिनेट होते. गौरव आणि फरहाना आधीच सेफ असल्याचं सलमान खानने सांगितलं. त्यानंतर सलमान खान प्रणितला एक स्पेशल पावर दिली. त्याला एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी एका स्पर्धकाचे नाव घेण्यास सांगितलं. त्याने अशनूरचं नाव घेतलं त्यामुळे तो शेफ झाला. अभिषेक आणि नीलम या आठवड्यातून घराबाहेर गेले.
advertisement
दरम्यान आऊट झाल्यानंतर नीलम गिरी अजिबात रडली नाही. ती शेवटी अरमानला आय लव्ह यू म्हणून बाहेर गेली. तर अभिषेक आऊट झाल्यानंतर अशनूर ढसाढसा रडला. तू परत येशील, तुला सीक्रेट रूममध्ये ठेवणार असं काही होईल. तर अशनूर त्याला म्हणाला, मी ट्रॉफी जिंकली नाही म्हणून काय झालं, सगळ्यांची मनं तर जिंकली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 8:06 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss 19 : प्रणित मोरे आला पुन्हा, सलमान खानने 2 स्पर्धकांना दाखवला बाहेरचा रस्ता


