Mumbai Weather : कोकणात थंडीची चाहूल, मुंबईतही हवापालट, पाहा आजचं हवामान अपडेट

Last Updated:
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला पाऊस अखेर ओसरू लागला असून कोकण किनारपट्टीवर आता थंडीची चाहूल लागली आहे. हवामानात स्पष्ट बदल जाणवत असून, दिवस उष्ण आणि रात्री गारवा वाढताना दिसत आहे.
1/5
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला पाऊस अखेर ओसरू लागला असून कोकण किनारपट्टीवर आता थंडीची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहणार आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामानात स्पष्ट बदल जाणवत असून, दिवस उष्ण आणि रात्री गारवा वाढताना दिसत आहे.

advertisement
2/5
मुंबईत आज हवामान मुख्यतः स्वच्छ आणि कोरडे राहणार आहे. दिवसाच्या वेळेत ऊन तीव्र राहील आणि तापमान सुमारे 30 ते 32 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. रात्री मात्र थोडा गारवा जाणवेल, तापमान 22 अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यांवर हलका वारा सुटलेला राहील. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली दमट उष्णता आता कमी होत असून सकाळी आणि रात्री हवेत हलका थंडावा जाणवत आहे.

3/5
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही आज हवामान स्वच्छ आणि कोरडे राहील. सकाळच्या वेळी हलका धुकेपणा आणि गारवा जाणवेल, तर दुपारी ऊन चटकदार पडेल. तापमान 18 ते 33 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. हवेत आर्द्रता कमी झाल्याने उकाडा काहीसा कमी वाटेल. पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे नागरिकांना सकाळी थंडीचा स्पर्श जाणवू लागला आहे.

4/5
पालघर जिल्ह्यातही आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार असून पावसाची शक्यता नाही. सकाळी आणि रात्री तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस इतके खाली जाऊ शकते, तर दिवसात ते 31 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यांतील जोरदार पावसानंतर वातावरणात गारवा वाढलेला दिसत आहे. किनारपट्टीवरील वारे मंद आहेत, त्यामुळे हवेत प्रसन्नता आणि थंडीचा हलका स्पर्श जाणवतोय.

5/5
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनाऱ्यावरील जिल्ह्यांतही हवामान कोरडे राहणार आहे. दिवसाच्या वेळेत सूर्यप्रकाश तीव्र राहील आणि तापमान 30 ते 33 अंश सेल्सिअस, तर रात्री 16 ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पावसाने आता पूर्ण विश्रांती घेतल्याने येथील वातावरणात थंडीची सुरुवात जाणवत आहे. सकाळी धुकेपणा आणि थंड वारे, तर दुपारी ऊन अशा तिहेरी वातावरणाचा अनुभव या भागांतील नागरिकांना मिळणार आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement