Alandi Kartiki Yatra 2025 : विठ्ठल नामात रंगली आळंदी! कार्तिकी यात्रेनिमित्ताने वाहतुकीत मोठा बदल, कुठं रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Last Updated:
Alandi Kartiki Yatra 2025 Traffic Updates : आळंदी कार्तिकी यात्रा ही 12 ते 20 नोव्हेंबरपर्यंत असल्याने वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेले आहेत. जाणून घ्या कोणते रस्ते बंद असतील तर कोणत्या पर्यायी मार्गाचा वापर करता येणार आहे.
पुणे : आळंदीमध्ये होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्ताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने काही दिवस वाहतुकीत मोठे बदल जाहीर केले आहेत. नेमके कोणते रस्ते खुले राहतील तर भाविकांनी कोणत्या मार्गाने प्रवास करावा आणि दररोज कामावर जाणाऱ्या वाहनचालकांनी कोणते पर्यायी मार्ग वापरावेत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आळंदी कार्तिकी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल
श्री क्षेत्र आळंदीमध्ये ही यात्रा 12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान भरणार आहे. त्यातही 15 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आणि 17 नोव्हेंबर रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा असल्यामुळे महाराष्ट्र आणि देशभरातून भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
advertisement
जड-अवजड वाहनांना 'या' मार्गावर असेल बंदी
12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अत्यावश्यक सेवा आणि दिंडीतील वाहने वगळता सर्व जड अवजड वाहनांसाठी काही मार्ग बंद राहतील. त्यात मोशी चौक, भारतमाता चौक, चिंबळी फाटा तसेच आळंदी फाटा, माजगाव फाटा, भोसे फाटा, चाकण-वडगाव घेणंद मार्ग, मरकळ मार्ग, पुणे-दिघी मॅगझीन चौक मार्ग यावरून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत तर देहूगाव कमान, कॅनबे चौक आणि तळेगाव-चाकण रोडवरील काही रस्त्यांवरही प्रवेश बंद राहील. वाहनांना जयगणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक, भोसरी चौक मॅगझीन चौक, कोयाळी कमान, कोयाळी मरकळगाव मार्गे पर्यायी मार्ग वापरावे लागतील.
advertisement
आळंदी शहरात प्रवेश बंदी
सर्व वाहनांना त्यात पण अत्यावश्यक सेवा आणि दिंडीतील वाहने वगळता पुणे-आळंदी, मोशी-आळंदी, चिंबळी-आळंदी, चाकण (आळंदी फाटा)-आळंदी, वडगाव घेणंद-आळंदी, मरकळ-आळंदी मार्गांवर प्रवेश बंद राहील.
पार्किंगची सोय अशी असेल!
वडगाव घेणंद-शेल पिंपळगावकडून येणाऱ्या वाहनांसाठी मुक्ताई मंगल कार्यालयाजवळ25 एकर पार्किंग उपलब्ध आहे तर वडगावकडून येणाऱ्या वाहनांसाठी वडगाव चौकाजवळील नगरपरिषद पार्किंग वापरता येईल.
advertisement
जाणून घ्या बस थांबे!
view commentsआळंदीहून निघणाऱ्या एस.टी आणि पीएमपीएमएल बससेवांसाठी प्रशासनाने ठराविक थांबे ठरवले आहेत. त्यात पण सर्व बसेससाठी योगिराज चौक हा मुख्य स्टँड असेल तर देहूगावकडे जाणाऱ्या बससाठी डुडुळगाव जकातनाका, पुणे दिशेकडे चऱ्होली फाटा, वाघोली आणि शिक्रापूरकडे धानोरे फाटा, चाकणकडे इंद्रायणी हॉस्पिटल परिसर तर शिक्रापूर, शेलपिंपळगाव आणि नगरकडे जाणाऱ्या बससाठी विश्रांतवड-वडगाव रोड हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 8:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Alandi Kartiki Yatra 2025 : विठ्ठल नामात रंगली आळंदी! कार्तिकी यात्रेनिमित्ताने वाहतुकीत मोठा बदल, कुठं रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते?


