Weather Alert: महाराष्ट्रात अचानक बदलली हवा, मुंबईसह 11 जिल्ह्यांबद्दल नवी अपडेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Weather Alert: राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
गणपती विसर्जनानंतर राज्यामधून पावसाने काढता पाय घेतला आहे. त्याचबरोबर वातावरणातील दमटपणा वाढला असून तापमानामध्ये देखील वाढ पाहायला मिळत आहे. 10 सप्टेंबर रोजी राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने सतर्कतेचा कोणताही अलर्ट दिलेला नाही. परंतु, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. 10 सप्टेंबर रोजीचा राज्यातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
उत्तर महाराष्ट्रात मागील काही दिवसात जोरदार पाऊस झाला. परंतु, आता पावसाने माघार घेतली आहे. नाशिक मध्ये 10 सप्टेंबर रोजी साधारणपणे ढगाळ आकाश राहणार असून मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एढा असेल. अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्येही ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे.
advertisement
मराठवाड्यात आठही जिल्ह्यांना पावसाचा कोणताही इशारा हवामान विभागाने दिलेला नाही. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर मध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून मध्यम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असेल.
advertisement
advertisement