Sleep Issue : रात्रभर झोपलं तरी सकाळी पुन्हा झोप येतेय? तुमच्यासोबत ही असंच होतं, मग सावधान! तज्ज्ञांकडून गंभीर इशारा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Sleep Issue : सकाळी उठल्यावर थकलेलं वाटतं, पुन्हा झोपायची इच्छा होते. आपण विचार करतो, 'मी तर व्यवस्थित झोपलो होतो, मग असं का होतंय?' अशी अवस्था अधूनमधून सगळ्यांनाच जाणवते, पण जर ही समस्या दररोजचीच झाली असेल, तर ती सामान्य नाही असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.
आजकाल अनेक जणांना अशी समस्या जाणवते की रात्रभर चांगली झोप घेतल्यानंतरही शरीर थकलेलं वाटतं, उठल्यावर ताजेपणाची जाणीव होत नाही आणि पुन्हा झोपायची इच्छा होते. आपण विचार करतो, 'मी तर व्यवस्थित झोपलो होतो, मग असं का होतंय?' अशी अवस्था अधूनमधून सगळ्यांनाच जाणवते, पण जर ही समस्या दररोजचीच झाली असेल, तर ती सामान्य नाही असं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.
advertisement
इडिओपॅथिक हायपरसोम्निया म्हणजे काय?तज्ज्ञांच्या मते, अशी स्थिती इडिओपॅथिक हायपरसोम्निया (Idiopathic Hypersomnia) म्हणून ओळखली जाते. ही एक न्यूरोलॉजिकल स्लीप डिसऑर्डर, म्हणजेच मेंदूशी संबंधित झोपेचा आजार आहे. या विकारात व्यक्ती कितीही झोप घेत असली तरी, तिचं शरीर पुन्हा झोपायचं संकेत देत राहतं. जाग आल्यानंतरही थकवा, गोंधळलेपणा आणि निष्क्रियता जाणवते.
advertisement
या आजाराची प्रमुख लक्षणंरात्रभर झोप घेऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे, दिवसभर सतत जांभई येणे किंवा झोपेचं ओझं जाणवणे, उठल्यानंतर काही काळ गोंधळलेपणा किंवा दिशाभूल होणे. कामावर, अभ्यासात किंवा गाडी चालवताना झोप येणे किंवा लक्ष केंद्रित न होणे. या लक्षणांमुळे अनेकदा डॉक्टरसुद्धा याला इतर निद्रा विकार किंवा मानसिक ताणासारख्या स्थितीशी गोंधळतात.
advertisement
यामागचं कारण काय?संशोधनानुसार, इडिओपॅथिक हायपरसोम्नियाचं खरं कारण अजून स्पष्ट नाही. 2024 मध्ये ScienceDirect.com वर प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, हा विकार मेंदूतील झोप-जागरण चक्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या प्रणालीतल्या असंतुलनामुळे निर्माण होतो. म्हणजेच, मेंदू योग्य वेळी “जागं राहा” हा सिग्नल देत नाही आणि त्यामुळे व्यक्तीला अत्यधिक झोप येते.
advertisement
उपचार काय आहेत?या विकारासाठी एखादा ठराविक उपचार नाही. पण तज्ज्ञ सांगतात की योग्य सवयींमुळे त्यावर नियंत्रण ठेवता येतं. नियमित झोपेची वेळ पाळा, शांत, स्वच्छ आणि अंधाराचं वातावरण ठेवा. झोपेपूर्वी मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीपासून दूर राहा. कॅफिन आणि जड अन्न झोपेच्या आधी टाळा. उपचाराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे लक्षणांवर नियंत्रण ठेवणं आणि दैनंदिन जीवनात पुन्हा लक्ष केंद्रीत करण्यास मदत करणं.
advertisement
advertisement


