स्क्रोल केलं इंस्टाग्राम… आणि सुरू झाला खास बिझनेस; उभारला स्वतःचा ब्रँड ‘ब्लॅक बटरफ्लाय इंडिया’
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
आपला स्वतःचा व्यवसाय असावा असे आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते. सध्या जे तरुणी आहेत नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसाय करण्यावरती त्यांचा भर आहे आणि हीच संकल्पना मनात घेऊन छत्रपती संभाजी नगरात राहणाऱ्या प्रियंका देखील स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आहे.
छत्रपती संभाजीनगर: आपला स्वतःचा व्यवसाय असावा असे आपल्यापैकी अनेकांची इच्छा असते. सध्या जे तरुणी आहेत नोकरी करण्यापेक्षा स्वतःच्या व्यवसाय करण्यावरती त्यांचा भर आहे आणि हीच संकल्पना मनात घेऊन छत्रपती संभाजी नगर शहरात राहणाऱ्या प्रियंका देखील स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आहे. तर या व्यवसायाची तुला संकल्पना कुठून सुचली हे आपण प्रियांकाकडून घेणार आहोत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रियंका मोरे हिचे बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे.सध्याला ते सीएची तयारी करते आणि त्यासोबतच ती एका ठिकाणी पार्ट टाइम जॉब देखील करते. एकदा प्रियंकाला इंस्टाग्राम आणि youtube वरती स्क्रोल करत असताना तिला एका कॅनडियन महिलेचा व्हिडिओ दिसला ती मला देखील हाच व्यवसाय करत होते आणि तिथून प्रियंकाला या व्यवसायाची संकल्पना सुचली आणि तिने देखील ठरवलं की आपण देखील हा व्यवसाय करायचा.
advertisement
ही संकल्पना सुचल्यानंतर प्रियंकाने तिच्या आईला सांगितले आणि त्यानंतर तिच्या देखील तिला होकार दिला आणि तिने हा व्यवसाय सुरू केला फक्त तीन हजार रुपये गुंतवणूक करून तिने हा व्यवसाय सुरू केला. 'ब्लॅक बटरफ्लाय इंडिया' या नावाने तिने स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे.सध्याला प्रियंका वेगवेगळ्या पद्धतीचे स्क्रंची तयार करते. यामध्ये तुम्हाला सिल्क प्रिंटेड किंवा लॉन्ग बो अशा सर्व प्रकारचे स्क्रंची हे तुझ्याकडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे इंस्टाग्राम वरती देखील तिचे पेज आहे आणि सध्याला तिने ॲमेझॉन वरती पण तिचा हा ब्रँड लाँच केलेला आहे. याच्या माध्यमातून तिला महिन्यासाठी चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे.
advertisement
तुम्हाला देखील कुठला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही देखील सुरू करू शकता फक्त व्यवसाय सुरू केल्यानंतर तो ग्रो व्हायला तुम्हाला खूप वेळ लागतो त्यामुळे तुम्ही संयम ठेवून व्यवसाय करावा असं प्रियंकाने सर्व तरुणांनी सांगितला आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Oct 27, 2025 9:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
स्क्रोल केलं इंस्टाग्राम… आणि सुरू झाला खास बिझनेस; उभारला स्वतःचा ब्रँड ‘ब्लॅक बटरफ्लाय इंडिया’
title=पार्ट टाइम जॉब करत प्रियंकाने सुरू केला स्वतःचा स्क्रंची व्यवसाय



