आता ट्रॅफिकमध्ये अडकायचं नाही, थेट उडून जायचं! SUV च्या किंमती घ्या हेलिकॉप्टर, इतकी असते किंमत..

Last Updated:
ध्या जीएसटीच्या दरात कपात झाली आहे त्यामुळे SUV च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, एसयूव्हीच्या किंमतीत हेलिकॉप्टर विकत घेता येईल का? तर त्याचं उत्तर हो आहे.
1/14
सध्या कुठे लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर आरामदायक आणि जलद प्रवासासाठी चांगल्या वाहनाचा नेहमी विचार केला जातो. खास करून अशा प्रवासासाठी ७ सीटर किंवा दमदार अशा SUV चा पहिला विचार केला जातो. सध्या जीएसटीच्या दरात कपात झाली आहे त्यामुळे SUV च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, एसयूव्हीच्या किंमतीत हेलिकॉप्टर विकत घेता येईल का? तर त्याचं उत्तर आहे. हेलिकॉप्टरमध्ये असे अनेक प्रकार आहे, ज्यामध्ये कमीत कमी किंमत एक हेलिकॉप्टर सहज विकत घेता येईल जे एखाद्या SUV च्या किंमतीपेक्षाही स्वस्त आहे. 

advertisement
2/14
मुळात हेलिकॉप्टर विकत घेणे म्हणजे ही काही साधी सुद्धी गोष्ट नाही. जर तुमचा मोठा उद्योग व्यवसाय असेल, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास असेल तर तुम्ही हेलिकॉप्टर खरेदी करू शकतात. पण त्यासाठी तुमचं उत्पन्नही तसं असायला हवं जर असेल तर खुशाल एखादं हेलिकॉप्टर तुम्ही दारात उभं करू शकतात. 

3/14
आता हेलिकॉप्टरचे प्रकार किती असतात? पहिला प्रकार येतो तो सामान्य नागरी हेलिकॉप्टर जे आपण सर्वत्र पाहत असतो,  जसे नेते मंडळी अशाच हेलिकॉप्टरने प्रवास करतात. या हेलिकॉप्टरचा वापर हा खाजगी, प्रशिक्षण, पर्यटन,  टॅक्सी/ चार्टर सेवेत प्रामुख्याने होतो.  काही ठिकाणी हवाई रुग्णवाहिका,  जड वस्तूंची वाहतूक, शोध आणि बचाव कार्य आदी क्षेत्रातही याचा वापर केला जातो. यानंतर जे हेलिकॉप्टर वापरले जातात ते सैन्य दलात वापरले जातात, त्यांची बांधणी हे विशेष दर्जाची असते. 

4/14
आता सर्वसामान्य माणूस हेलिकॉप्टर कसं खरेदी करू शकतो? तर सर्व सामान्य माणसांना  सिंगल रोटर हेलिकॉप्टर यामध्ये एक मोठा मुख्य रोटर अर्थात पाते आणि एक लहान टेल रोटर मागील पाते असते. उदाहरण सांगायचं झालं तर रॉबिन्सन R22, बेल 407, एअरबस H135 हे ते हेलिकॉप्टर आहे.  तसंच ट्विन रोटर/टँडेम रोटर या प्रकारचे हे हेलिकॉप्टर असतात यात दोन मोठी पाती असतात. 

5/14
जगातील सर्वात स्वस्त हेलिकॉप्टर जे आहे त्याला
जगातील सर्वात स्वस्त हेलिकॉप्टर जे आहे त्याला "किट-बिल्ड" (Kit-Build) प्रकारातील किंवा खूप लहान पर्सनल हेलिकॉप्टरचा समावेश होतो. अशा हेलिकॉप्टरला मॉस्किटो हेलिकॉप्टर म्हटलं जातं. जे आकाराने लहान आणि दोन जण बसू शकतात एवढी जागा असते. यामध्ये  Mosquito Helicopter किंवा हेलिकॉप्टर UM-1 सारखी हे मॉडेल्स लोकप्रिय आहे. ही जगातली सर्वात स्वस्त हेलिकॉप्टर आहे.
advertisement
6/14
या हेलिकॉप्टरची किंमत  सुमारे 20,000 ते 40,000 डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात बोलायचं झालं तर अंदाजे  16 लाख ते  33 लाख रुपये किंमत असू शकते. पण, हे हेलिकॉप्टर सार्वजनिक वाहतूक किंवा व्यावसायिक वापरासाठी इतकी शक्तिशाली हेलिकॉप्टर नसतात. यामध्ये दोन माणसं आरामात बसू शकतात आणि कमी किलो मिटर परिसरातला प्रवास तुम्ही करू शकतात. 

7/14
Mosquito Ultralight Helicopter -मॉस्किटो अल्ट्रालाइट हेलिकॉप्टर सारखे सिंगल सीट किट-बिल्ड हेलिकॉप्टर सुमारे 38 लाख रुपयांना येतंय. ही किंमत फक्त हेलिकॉप्टर किटची आहे. यात आयात शुल्क, कर आणि इतर खर्च वगळलेला आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये या हेलिकॉप्टरची किंमत 16 ते 33 लाख इतकी आहे.

8/14
भारतात आणखी एक हेलिकॉप्टर विकले जाते त्याचं नाव आहे  रॉबिन्सन R44 (robinson r44 helicopter). या हे मॉडेल एक बिझनेस क्लाससाठी वापरले जात. या मॉडेलची किंमत भारतात सुमारे  4.12 कोटीपासून सुरू होते.  

9/14
 कम्पोजिट-एफएक्स एक्सई 290 हेलिकॉप्टर हे सुद्धा एक सर्वाधिक विक्री होणारे हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरची भारतात किंमत  जवळपास 51 लाख 91 हजार रुपये आहे. 

10/14
Helicycle helicopter हे एक हेलिकॉप्टर आहे जे स्वस्त आहे. या हेलिकॉप्टरची किंमत 67,000 डॉलर इतकी आहे. भारतात या हेलिकॉप्टरची किंमत जवळपास ५८ लाख ९५ हजार इतकी आहे. 

11/14
मुळात हेलिकॉप्टरची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की त्याचे मॉडेल, क्षमता (सीट्स), इंजिनचा प्रकार, तंत्रज्ञान आणि उत्पादन कंपनी यावर ठरते.  र  लक्झरी, किंवा विशेष कार्यासाठीची जसे  रुग्णवाहिका, ऑफशोअर हेलिकॉप्टर खरेदी करायचं ठरलं तर किंमत  10 कोटी ते 60 कोटी किंवा त्याहूनही खूप जास्त असू शकते.

12/14
 नियम आणि अटी काय? जर महाराष्ट्रात हेलिकॉप्टर खरेदी करायचं असेल तर 
भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाची परवानगी लागेल,  परदेशातून आणल्यास आयात शुल्क भरावे लागते आणि DGCA कडून आवश्यक मान्यता घ्यावी लागते. तसंच DGCA द्वारे प्रमाणित 'कमर्शियल पायलट लायसन्स (CPL)' किंवा 'खासगी पायलट लायसन्स (PPL)' असणे आवश्यक आहे, जे हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैध असेल.
नियम आणि अटी काय? जर महाराष्ट्रात हेलिकॉप्टर खरेदी करायचं असेल तर भारताच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाची परवानगी लागेल, परदेशातून आणल्यास आयात शुल्क भरावे लागते आणि DGCA कडून आवश्यक मान्यता घ्यावी लागते. तसंच DGCA द्वारे प्रमाणित 'कमर्शियल पायलट लायसन्स (CPL)' किंवा 'खासगी पायलट लायसन्स (PPL)' असणे आवश्यक आहे, जे हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैध असेल.
advertisement
13/14
एअरवर्दीनेस सर्टिफिकेट (C of A) हे  प्रमाणपत्र लागेल.   हेलिकॉप्टरची देखभाल DGCA मान्यताप्राप्त देखरेख संस्थेकडून (MRO) नियमितपणे करणे बंधनकारक आहे.
 व्यावसायिक किंवा खासगी उड्डाणापूर्वी भारतीय हवाई दल (IAF), भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि DGCA कडून एअरस्पेस वापरण्याची परवानगी (Airspace Clearance) घेणे आवश्यक आहे.
एअरवर्दीनेस सर्टिफिकेट (C of A) हे प्रमाणपत्र लागेल. हेलिकॉप्टरची देखभाल DGCA मान्यताप्राप्त देखरेख संस्थेकडून (MRO) नियमितपणे करणे बंधनकारक आहे. व्यावसायिक किंवा खासगी उड्डाणापूर्वी भारतीय हवाई दल (IAF), भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) आणि DGCA कडून एअरस्पेस वापरण्याची परवानगी (Airspace Clearance) घेणे आवश्यक आहे.
advertisement
14/14
 त्यानंतर  शहरी किंवा इतर भागात हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी  त्या भागातील जिल्हाधिकाऱ्यांची किंवा पोलीस आयुक्तांची  'ना हरकत प्रमाणपत्र' घेणे आवश्यक असते. अनेकदा, लँडिंगच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाची परवानगीही लागते. हेलिपॅडच्या आसपास विशिष्ट अंतरामध्ये (उदा. ५०० मीटर परिघात) उंच इमारती, विजेच्या तारा किंवा इतर अडथळे नसावेत लागतात.

Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement