फोन चार्जिंगसाठी तुम्ही पण Power Bank वापरतात का? मग सावधान तुम्ही 'ही' चुक केली तर फोनचं होईल नुकसान

Last Updated:
फोनची बॅटरी दिवसभर टिकत नाही ज्यामुळे लोक त्याला दिवसातून कधी दोनदा तर तिनदा चार्ज करतात. त्यामुळे हल्ली अनेकांकडे पॉवर बँकचा पर्याय उरला आहे.
1/8
आजच्या वेगवान जीवनशैलीत मोबाईलशिवाय एक क्षणही जगणं अवघड झालं आहे. लोक सगळेच काम आपल्या फोनवर करु लागले आहेत, मग ते ऑफिसचं काम असो, ऑनलाइन पेमेंट असो किंवा सोशल मीडियावर स्क्रोलिंग, सगळं काही स्मार्टफोनवरच चालतं. परिणामी फोनची बॅटरी दिवसभर टिकत नाही ज्यामुळे लोक त्याला दिवसातून कधी दोनदा तर तिनदा चार्ज करतात. त्यामुळे हल्ली अनेकांकडे पॉवर बँकचा पर्याय उरला आहे.

advertisement
2/8
प्रवासात पॉवर बँक खूपच चांगला उपाय असल्यामुळे अनेक लोक आपल्यासोबतच तो ठेवतात. प्रवासात किंवा बाहेर असताना तो जणू ‘मोबाईलचा ऑक्सिजन सिलिंडर म्हणूनच काम करतो जो आपल्या फोनला बंद होऊ देत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, वारंवार पॉवर बँकने चार्जिंग केल्याने तुमच्या मोबाईलच्या बॅटरीचं आयुष्य कमी होतं आणि कधी-कधी तो धोकादायकही ठरू शकतो?

3/8
का वाढला पॉवर बँकचा ट्रेंड?स्मार्टफोन आता केवळ संवादाचं साधन राहिलं नाही, तर तो काम, मनोरंजन आणि शिक्षणाचा भाग बनला आहे. सततच्या स्क्रीन टाइममुळे आणि अॅप्सच्या वापरामुळे बॅटरी झपाट्याने रिकामी होते. त्यामुळे पॉवर बँक हा लोकांसाठी ‘ऑन-द-गो’ चार्जिंगचा सोपा पर्याय झाला आहे. मात्र, त्याचं अतिवापर दीर्घकाळात डिव्हाइसला नुकसान पोहोचवू शकतो.

4/8
बॅटरी हेल्थवर होतो वाईट परिणामजर तुम्ही दरवेळी पॉवर बँकद्वारेच फोन चार्ज करत असाल, तर हे बॅटरीच्या ‘सेल्स’वर अतिरिक्त ताण टाकतं. त्यामुळे बॅटरीची क्षमता (Battery Capacity) हळूहळू कमी होत जाते आणि फोनचा बॅकअप कमी होतो. विशेषतः iPhone वापरणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला हवं, कारण त्यांची बॅटरी लाइफ पटकन घटते.

5/8
ओव्हरहिटिंग : एक लपलेला धोकापॉवर बँकद्वारे चार्जिंग करताना फोनला चार्ज होण्यासाठी अधिक वेळ लागतो. यामुळे फोन गरम होऊ लागतो आणि दीर्घकाळ अशा स्थितीत राहिल्यास बॅटरीसह फोनच्या इंटरनल पार्ट्सना देखील हानी पोहोचू शकते. काही वेळा अशा गरम झालेला फोन फुटला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

6/8
कसा निवडावा योग्य पॉवर बँक?आधीच महागड्या पॉवर बँकमुळे ही फोनला धोका आहेच, त्याच बाजारात अनेक स्वस्त आणि नकली पॉवर बँक उपलब्ध असतात ज्यात सर्किट प्रोटेक्शन नसतं. त्यामुळे नेहमी ब्रँडेड आणि सर्टिफाइड पॉवर बँकच वापरावा. चांगल्या पॉवर बँकमध्ये किमान 12 लेयर सर्किट प्रोटेक्शन आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट असणं आवश्यक आहे. त्यामुळे बॅटरीचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.

7/8
सुरक्षित चार्जिंगसाठी काही उपयुक्त टिप्सफोन 20% पेक्षा कमी झाल्यावरच चार्ज करा आणि 100% झाल्यावर लगेच काढा.
रात्रीभर फोन चार्जिंगला लावू नका.
पॉवर बँक फक्त गरजेच्या वेळीच वापरा.
दीर्घ प्रवासासाठी 10,000 mAh किंवा त्याहून जास्त क्षमतेचा पॉवर बँक वापरा.
फोन चार्ज करताना ओव्हरहिट होत असल्यास लगेच चार्जिंग थांबवा.
सुरक्षित चार्जिंगसाठी काही उपयुक्त टिप्सफोन 20% पेक्षा कमी झाल्यावरच चार्ज करा आणि 100% झाल्यावर लगेच काढा.रात्रीभर फोन चार्जिंगला लावू नका.पॉवर बँक फक्त गरजेच्या वेळीच वापरा.दीर्घ प्रवासासाठी 10,000 mAh किंवा त्याहून जास्त क्षमतेचा पॉवर बँक वापरा.फोन चार्ज करताना ओव्हरहिट होत असल्यास लगेच चार्जिंग थांबवा.
advertisement
8/8
पॉवर बँक हा नक्कीच उपयोगी साथीदार आहे, पण त्याचा अतिरेक तुमच्या फोनच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. योग्य ब्रँड निवडणं, चार्जिंगचे योग्य नियम पाळणं आणि सावधानता ठेवणं हेच स्मार्टफोन बॅटरीची खरी काळजी आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement