Nagar Parishad Election 2025: 'हा भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय', फडणवीसांनी विजयाचं श्रेय दिलं 'या' व्यक्तीला!
- Published by:Sachin S
Last Updated:
नगरपरिषद निवडणुकीमध्ये जे काही नगराध्यक्ष निवडून येतील ते ७५ टक्के असतील. भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.
मुंबई : नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ' महायुतीचा हा विजय आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो. त्यांच्या नेतृत्वाखाली हा चांगला विजय मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे' असं म्हणत फडणवीस यांनी विजयाचं श्रेय रवींद्र चव्हाण यांच्यासह संपूर्ण टीमला दिलं.
भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय
नगरपरिषद निवडणुकीमध्ये जे काही नगराध्यक्ष निवडून येतील ते ७५ टक्के असतील. भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, १२९ नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहे. आमच्या तिघांचे नगराध्यक्ष हे महायुतीचे आहे. नगरसेवकांमध्ये भाजपने रेकॉर्ड केला आहे. १६०२ आता ३३२५ नगरसेवक निवडून आले आहे, हा आमचा रेकॉर्ड आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
advertisement
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांनीही चांगली कामगिरी केली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो. त्यांच्या नेतृत्वाखाली हा चांगला विजय मिळाला आहे. या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. सगळ्या मंत्र्यांनी खूप चांगली मेहनत आणि मदत केली. खूप चांगला संवाद झाला, त्यामुळे अभूतपूर्व विजय मिळाला आहे. मला वाटतं, गेल्या २० -२५ इतिहासामध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे. तर या निवडणुकीत एकाही व्यक्ती विरोधात, एकाही पक्षााविरोधात कुणी बोललं नाही. आम्ही विकासावर मतं मागितली. त्याला सर्व लोकांनी साथ दिली. भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक आहे. आम्ही कुणावरही टीका केली नाही. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएबद्दल जी काही सकारात्मकता आहे. जे पी नड्डा आहे. कार्याध्यक्ष नवीन आहे. सगळ्यांनी आमच्यावर निवडणुकीची जबाबदारी दिली होती. ती आम्ही यशस्वीपणे पार पाडली आहे, असंही फडणवीस म्हणाले.
advertisement
हा विजय टीम भाजपचा
'सगळ्या नेत्यांनी चांगलं काम केलं आहे. साताऱ्या राजेंनी चांगलं काम केलं. मराठवाड्यात पंकजा मुंडे असतील अतुल सावे असतील. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. उत्तर महाराष्ट्रात जयकुमार रावल, गिरीश महाजन यांनी चांगलं काम केलंयय सगळ्या मंत्र्यांना जबाबदारी दिली ती सगळ्यांनी चाांगल्या प्रकारे पार पडली. टीम म्हणून सगळ्यांनी काम केलं. हा विजय टीम भाजपचा आहे. आता ही निवडणूक झाल्यानंतर या शहरातील लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ करून दाखवण्याचं काम करून विकास करून दाखवू, असं आश्वासनही फडणवीसांनी दिलं.
advertisement
'२०२४ नंतर भाजप आता शहरी आणि ग्रामीण भागाचा झाला आहे. सगळीकडे भाजपने विजय मिळवला आहे. २४ च्या वेळी मतं कमी झाली पण विजय मिळवला. भाजप हा सर्व समाजाचा पक्ष झाला आहे. ग्रामीण भागात चांगली मतं मिळवली आहे. भाजप हा नंबर १ पक्ष आहे' असंही यावेळी फडणवीस म्हणाले.
कोकणात भाजपचा पराभव का झाला?
'कोकणात रत्नागिरीत महायुतीत लढलो, सिंधुदुर्गात वेगळं लढलो, आता काही ठिकाणी जिंकलो काही ठिकाणी हरलो. पण काही ठिकाणी जिंकलो. कोकणामध्ये आमची टॅली कमी दिसतेय. तिथे महायुतीत लढलोय. काही ठिकाणी शिवसेनेचा, कुठे राष्ट्रवादीचा उमेदवार होता. त्यामुळे तसं दिसलं' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
advertisement
'आपली प्रतिष्ठापणाला न लावणे हा करंटेपणा'
मुळात विरोधी पक्षाच्या लक्षात आलं होतं महायुतीचा विजय होणार आहे. त्यामुळे ते बाहेर पडले नाही. आता आपण हरलो तर पुढे महापालिका आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल. त्यामुळे ते सांगायला मोकळे आहे. आम्ही काही उतरलो नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मी स्वत:10 हजार लोकसंख्या असलेल्या गावात गेलो होतो. पण कार्यकर्ते हे विधानसभेत लोकसभेत निवडून आणतात, त्यांच्या निवडणुकीत आपण आपली प्रतिष्ठापणाला न लावणे हा करंटेपणा आहे. निवडणुकीत हार जित होत असते, पण, कार्यकर्त्यांकडून काम करून घ्यायचं आणि त्यांच्या निवडणुकीसाठी पळ काढायचा, हे मला पटत नाही. भाजपमध्ये आम्ही असं कधी केलं नाही' असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे यांना टोला लगावला.
advertisement
सुधीरभाऊंना कुठली ताकद कमी झाली असेल तर...
view commentsपालकमंत्री बावनकुळे यांनी एक एक मतदारसंघात जाऊन काम केलं. ३० ते ३५ वर्षांनंतर कामठीमध्ये नगराध्यक्ष निवडून आले आहे. १५ अशा जागा आहे, जिथे चंद्रपूरचा विषय आहे, त्या संदर्भात ज्या नगरपालिकामध्ये आम्हाला यश मिळालं नाही. त्या कारणाचा विचार करू, कारण आता महापालिकेची निवडणूक आहे. कुठे कमी पडलो तिथे नक्की कमतरता पूर्ण करू. पक्षाने बळ दिलं नाही, असं मुनगंटीवार म्हणाले. असं नाही, पक्षाची दारं कुठल्या समाजासाठी बंद नाही. कुठल्या व्यक्तीसाठी बंद नाही. फक्त प्रवेश देताना व्यक्ती फायद्याचा आहे का नाही, याचा विचार केला पाहिजे. पक्षाने प्रवेश दिला आहे, त्याचा फायदा झाला आहे. पण सुधीरभाऊंना कुठली ताकद कमी झाली असेल तर त्याची भरपाई चंद्रपूर महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकद देऊन तिथे विजय मिळवू' असं आश्वासनच फडणवीस यांनी मुनगंटीवार यांना दिलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 5:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Parishad Election 2025: 'हा भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय', फडणवीसांनी विजयाचं श्रेय दिलं 'या' व्यक्तीला!










