जिंकल्याचा जल्लोष, फटाक्याची ठिणगी उडाली अन् धमाका, पंढरपुरात दुकानाला भीषण आग, PHOTO

Last Updated:
अकलूजमध्ये निवडणूक विजयोत्सवातील फटाक्यामुळे भंगार दुकान व फोर व्हीलर गॅरेजला भीषण आग लागली, लाखो रुपयांचे नुकसान, जीवितहानी नाही.
1/5
विरेंद्रसिंह उत्पात. प्रतिनिधी, पंढरपूर:  राज्यात नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी नुकतीच संपत असताना विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. विजयाचा जल्लोष गुलाल उधळून आणि फटाके फोडून केला जात आहे. या विजयोत्सवाला एक गालबोट लागणारी धक्कादायक घटना समोर आली.

advertisement
2/5
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरात आज एका दुर्दैवी घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. फटाक्याची ठिणगी उडावी आणि संपूर्ण दुकानाला आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते.

3/5
या दुर्घटनेत दोन दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. फटाक्याच्या ठिणगी पडून एक भंगाराचे दुकान आणि एका फोर व्हीलर गाडीच्या गॅरेजला आग लागली.

4/5
भंगाराच्या दुकानात प्लॅस्टिक आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. ही आग एवढ्या वेगाने पसरली की शेजारीच असलेल्या एका फोर-व्हीलर गाड्यांच्या गॅरेजलाही आपल्या कवेत घेतले.

5/5
अग्निशमन दलाचे दोन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने, ज्यावेळी ही आग लागली, त्यावेळी तिथे कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मात्र लाखो रुपयांचं नुकसान मात्र झालं आहे.

Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement