सातारकरांचा कुठं नाद करताय? आमदाराला लाजवेल इतक्या बहुमताने निवडून आला नगराध्यक्ष, मतांचं रेकॉर्डब्रेक
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
साताऱ्यात एकेकाळी राष्ट्रवादीचा बोलबाला असायचा परंतु शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकत्र आल्याने प्रतिस्पर्ध्यांची धूळधाण उडाली.
सातारा : सातारचे दोन्ही राजे एकत्र असल्याने निवडणुकीतली चुरस जरी कमी असली निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निकालात नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार अमोल मोहिते यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांचा पराभव केला. साताऱ्यात एकेकाळी राष्ट्रवादीचा बोलबाला असायचा परंतु यंदा शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकत्र आल्याने प्रतिस्पर्ध्यांची धूळधाण उडाली.
सातारा नगरपालिका निवडणुकीत एकूण २५ प्रभागात ५० नगरसेवक पदांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनेलविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आव्हान उभे केले होते. दोन्ही पक्षांनी प्रचारात चांगलीच रंगत भरली होती. शिवेंद्रराजे भोसले यांनी शहरभर मोठ्या ताकदीने प्रचार केला. तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी सभा घेतली. राष्ट्रवादीच्या सभेत दोन्ही राजे निशाण्यावर होते. परंतु मतदारांनी भाजपला पसंती दाखवत पुन्हा राजेंवर विश्वास दाखवला.
advertisement
आमदाराला लाजवेल इतक्या बहुमताने निवडून आला नगराध्यक्ष
नगर परिषद निवडणूक म्हटले की अगदी ५०-१०० मतांच्या फरकाने उमेदवार निवडून येतो. बहुतांश नगर परिषद निवडणूक निकालांत असेच चित्र पाहायला मिळते. परंतु साताऱ्याची गोष्ट निराळी आहे. इथल्या मतदारांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहिते यांना तब्बल ४२ हजार मतांच्या फरकाने विजयी केले. राष्ट्रवादीच्या सुवर्णादेवी पाटील यांना १५ हजार ५५६ मते मिळाली.
advertisement
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा करिष्मा
सातारा नगर परिषद निवडणुकीची सारी सूत्रे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडेच होती. प्रचाराच्या नियोजनपासून ते विजयी डावपेचांपर्यंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच आखणी केली होती. आजारपणामुळे उदयनराजे भोसले यांनी फार सक्रीयपणे सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळे सगळी भिस्त शिवेंद्रराजे भोसले यांच्यावरच होती. त्यांनी गृह जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे दणदणीत कामगिरी केली.
भारतीय जनता पक्षाने तिकीट नाकारल्याने सुवर्णा पाटील यांनी राष्ट्रवादीची तुतारी फुंकली. भारतीय जनता पक्षात अनेक वर्षे काम करूनही उमेदवारी देण्याची वेळ आल्यावर पक्षाने प्रामाणिकपणा आणि पक्ष संघटनेचा गुण न पाहता आम्हाला बाजूला सारले. परंतु राष्ट्रवादीने आम्हाला जवळ केले, असे पक्षांतर करतेवेळी सुवर्णा पाटील म्हणाल्या होत्या. परंतु निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केल्याने मतदारांनी पाटील यांना दणका दिला.
advertisement
साताऱ्यातील विजयी नगरपालिका
-सात भाजपचे नगराध्यक्ष विजयी
म्हसवड - पुजा विरकर
रहिमतपुर - वैशाली माने
वाई- अनिल सावंत
मेढा - रूपाली वाराघडे
मलकापुर - तेजस सोनवले
सातारा - अमोल मोहिते
फलटण - समशेरसिंह नाईक निंबाळकर
राष्ट्रवादी (अजित दादा राष्ट्रवादी ) दोन नगराध्यक्ष
महाबळेश्वर - सुनील शिंदे
पाचगणी - दिलीप बगाडे
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 4:54 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सातारकरांचा कुठं नाद करताय? आमदाराला लाजवेल इतक्या बहुमताने निवडून आला नगराध्यक्ष, मतांचं रेकॉर्डब्रेक







