मोठ्या मुलाला म्हणते 'गोला', आता धाकट्या मुलासाठीही भारती सिंगने निवडलं हटके नाव, तुम्ही विचारही केला नसेल!

Last Updated:
Bharti Singh Baby Boy Name: भारतीच्या मोठ्या मुलाचं नाव लक्ष्य आहे, पण सर्वजण त्याला प्रेमाने गोला म्हणतात. त्याच्या या युनिक नावामुळे तो बराच चर्चेत आला होता. अशातच भारतीने आपल्या दुसऱ्या मुलासाठीही एकदम हटके नाव निवडलं आहे.
1/9
मुंबई: भारताची लाफ्टर क्वीन भारती सिंग सध्या पुन्हा एकदा आईपणाचा आनंद लुटत आहे. १९ डिसेंबर २०२५ चा दिवस भारती आणि हर्षच्या आयुष्यात आनंदाची मोठी लाट घेऊन आला. भारतीच्या मोठ्या मुलाची म्हणजेच 'गोला'ची चर्चा तर जगभर असतेच, पण आता त्याच्या सोबतीला एक छोटा पाहुणा आला आहे.

advertisement
2/9
शुक्रवारी भारतीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची बातमी आली आणि टीव्ही विश्वात आनंदाची एकच लाट उसळली. लाफ्टर शेफ या शोमध्ये तिच्या सहकलाकारांनी मिठाई वाटली.

3/9
गेल्या काही वर्षांत भारतीने अनेकदा तिला मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. काही महिन्यांपूर्वी तिने अनोख्या अंदाजात ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं तिच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना सांगितलं होतं. ही गोड बातमी ऐकून सर्वच खूप खूश झाले.

4/9
अखेर भारतीच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. गोलाच्या साथीला आता नवा साथीदार आला आहे. दरम्यान नुकतंच भारतीने आपल्या नव्या व्लॉगमध्ये तिच्या बाळाचं नाव सर्वांना सांगितलं आहे. या व्लॉगमध्ये भारतीने तिच्या डिलिव्हरीच्या वेळीचा काळ कसा होता आणि बाळाच्या जन्माबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

5/9
भारतीने सांगितलं की,
भारतीने सांगितलं की, "सकाळचे ६ वाजले होते आणि अचानक मला काहीतरी वेगळं जाणवलं. सगळं ओलं झालं होतं. मी घाबरून डॉक्टरांना फोन केला, तेव्हा कळलं की वॉटर बॅग फुटली आहे. माझे हात-पाय थरथरत होते, कारण मी नुकतीच बाळाची बॅग पॅक करायला घेतली होती आणि हे सगळं इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं."
advertisement
6/9
त्या थंडीच्या सकाळी, ओले कपडे आणि बेडशीटमध्ये अडकलेली भारती प्रचंड अस्वस्थ होती. हर्षने तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं. हर्ष सांगतो की, गोलाच्या वेळी भारतीने ८-१० तास असह्य वेदना सहन केल्या होत्या, पण यावेळी मात्र भारतीची परिस्थिती चांगली होती. सगळं काही अगदी झटपट पार पडलं!

7/9
भारतीच्या मोठ्या मुलाचं नाव लक्ष्य आहे, पण सर्वजण त्याला प्रेमाने गोला म्हणतात. त्याच्या या युनिक नावामुळे तो बराच चर्चेत आला होता. अशातच भारतीने आपल्या दुसऱ्या मुलासाठीही एकदम हटके नाव निवडलं आहे. या चिमुकल्याचं नाव भारतीने लाडाने 'काजू' असं ठेवलंय!

8/9
ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा 'मुलगा झालाय' असं कळलं, तेव्हा भारतीचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती म्हणते,
ऑपरेशन थिएटरमध्ये जेव्हा 'मुलगा झालाय' असं कळलं, तेव्हा भारतीचा आनंद गगनात मावेनासा झाला. ती म्हणते, "काजू सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे, पण हर्ष म्हणतोय की तो खूपच क्यूट दिसतोय." हर्षने मात्र नेहमीप्रमाणे आपल्या विनोदी शैलीत भारतीची खेचली. तो म्हणाला, "भारती, आता तुझ्या आयुष्यात तीन मुलं आहेत, दोन जाडे (गोला आणि काजू) आणि एक बारीक (मी स्वतः)!"
advertisement
9/9
दरम्यान भारती आणि हर्षवर सध्या संपूर्ण मनोरंजन सृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'गोला' आणि 'काजू'ची जोडी आता सोशल मीडियावर कोणता नवा धमाका करते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement