सोलापूर कांदा मार्केटमधून मोठं अपडेट, आवक घटली, क्विंटलला किती मिळाला भाव?
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur Onion Market: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 280 गाड्या कांद्याची आवक झाली आहे. मात्र, दरांत मोठी घसरण झाली आहे.
सोलापूर: सोलापूरला कांद्याचं मोठं मार्केट असून इथून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात होते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारीपर्यंत कांद्याची आवक वाढली होती. तरीही कांद्याचे दर 1000 ते 1700 पर्यंत गेले होते. यामुळे शेतकरी आनंदी झाला होता. पण पुन्हा कांद्याचे दर घसरले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याचे दर घसरण्याची कारणेच कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितली आहेत.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान 5000 कांद्याच्या ट्रकची आवक झाली होती. यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसत होते. 1000 ते 1700 पर्यंत कांद्याला दर मिळत होता तर चांगल्या कांद्याला 2200 रुपये पर्यंत दर मिळत होता. आता मात्र पुन्हा एकदा कांद्याच्या दरात घसरण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 500 रुपये पासून ते 1000 रुपये क्विंटल दर मिळत आहे. क्वचित एखाद्या कांद्याला 1500 ते 1700 रुपये क्विंटल दर मिळत आहे.
advertisement
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज 280 गाड्या कांद्याची आवक झाली आहे. मात्र तरीही कांद्याच्या दरांतील घसरण शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ठरत आहे. शेतकऱ्यांनी घातलेला खर्च देखील निघणं अवघड झालं आहे. सध्या बाजारात कांद्याची आवक जरी कमी असली तरी बाजारात कांद्याला मागणी नसल्याने कांद्याला भाव मिळत नसल्याची माहिती कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी दिली.
advertisement
दरम्यान, सरकारने कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र, मागणी नसल्याने कांद्याला भाव मिळत नाही. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून सध्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, या ठिकाणी कांदा विक्रीसाठी पाठवला जात आहे. सध्या मिळत असलेल्या कांद्याच्या भावामुळे शेतकरी आणि व्यापारी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 11:33 AM IST








