Weather Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, कल्याण-डोंबिवलीला पुन्हा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रातील अवकाळी संकट टळलं आहे. कल्याण-डोंबिवलीतील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच घोंघावणारं अवकाळी संकट आता टळलं आहे. मात्र, हवामानात पुन्हा विचित्र बदल जाणवत आहेत. सकाळी गारठा कायम असून दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. मुंबई-ठाणेकरांना देखील हवामानातील बदलांचा सामना करावा लागत आहे. आज, 4 फेब्रुवारी रोजी कल्याण-डोंबिवलीत हवामान कसं राहील? जाणून घेऊ.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बदलापूरमध्ये हवामान अंशतः ढगाळ ते स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल 29 अंश सेल्सिअस राहील. दिवसभर ऊन-सावलीचे वातावरण असेल, तर रात्रीच्या वेळी हवेत हलका गारवा राहील. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान पुढील काही दिवस स्थिर असून, सकाळ-संध्याकाळ हलकी थंडी जाणवू शकते. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंशावर राहील. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.








