Kalyan: भटके कुत्रे राहिले बाजूला, पोलीस स्टेशनमध्ये वेगळंच मॅटर पोहोचलं! कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीतले रहिवाशी अडचणीत
- Published by:Sachin S
Last Updated:
कल्याणमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वाधवा मेडोज या सोसायटीमध्ये प्राणी मित्र आणि रहिवाशांमध्ये वाद विकोपाला गेला आहे.
कल्याण: सोसायटी आणि वाद हे काही नवीन नाही. प्रत्येक सोसायटीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद सुरूच असतात. अशातच कल्याणमधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वाधवा मेडोज या सोसायटीमध्ये प्राणी मित्र आणि रहिवाशांमध्ये वाद विकोपाला गेला आहे. भटक्या कुत्र्याला सोडण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप करून २ प्राणी मित्रांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. आता कुत्र्याला मारल्याचा आरोप करत प्राणी मित्रांनी रहिवाशांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील वाधवा मेडोज या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये वाद झाला आहे. भटक्या कुत्र्यांचा दुसऱ्या ठिकाणी सोडण्याकरीता प्राणी मित्रांनी रहिवासीयांकडे पैसे मागितल्याचा आरोप झाल्यावर खडकपाडा पोलिसांनी दोन प्राणी मित्रांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आता एका भटक्या कुत्र्याला मारुन टाकलं आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलीस ठाण्यात रहिवासियांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
कल्याणमधील वाधवा सोसायटीच्या परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सोसायटीत भटके कुत्रे शिरतात. आत्तापर्यंत ८० जणांना चावा घेतला आहे. या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतला, त्याची संख्या जास्त आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दोन प्राणी मित्रांना रहिवासियांना विनंती केली होती. प्राणी मित्रांनी सोसायटीच्या रहिवाशांकडून दह महिन्याला १६ हजार रुपये मागितले होते. या रक्कमेवरून रहिवाशी आणि प्राणी मित्रांमध्ये वाद झाला. रहिवाशांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला.
advertisement
रहिवाशांनी कुत्र्याला मारलं अन् गुन्हा दाखल
पोलिसांनी प्राणी मित्र हिर राजपूत आणि रत्ना पुरोहित या दोघींच्या विरोधात खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. आता पोलिसांनी जेव्हा या दोन्ही प्राणी मित्रांना चौकशीसाठी बोलावं त्यावेळी एका भटक्या कुत्र्याला सोसायटीतील लाेकांनी मारुन टाकल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला आहे. या आरोपा आधारे खडकपाडा पोलिसांनी भटक्या कुत्र्याला मारुन टाकल्याच्या प्रकरणी सोसायटीतील रहिवासी असलेल्या एका अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. हे प्रकरण आता आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 8:06 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Kalyan: भटके कुत्रे राहिले बाजूला, पोलीस स्टेशनमध्ये वेगळंच मॅटर पोहोचलं! कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीतले रहिवाशी अडचणीत









