advertisement

Fan : पंखा फुल स्पीडवर तरीही हवा कमी? यामागे आहे पंखा फिरण्याची चुकीची दिशा, 90% लोकांना हे माहितच नाही

Last Updated:

बहुतेक लोकांना वाटतं की पंखा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (Clockwise) फिरतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देणारा पंखा हा खरं तर घड्याळाच्या उलट दिशेने फिरत असतो. हो तुम्ही बरोबर वाचलत की उन्हाळ्यातील पंखा हा उलट्या दिशेनं फिरणारा हवा. हे कसं शक्य, चला जाणून घेऊ

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजकाल उन्हाचा तडाखा इतका वाढलाय की घरात शिरल्या शिरल्या आपण पहिलं काम करतो ते म्हणजे पंखा चालू करण्याचं. पण कधी विचार केलाय का, की तो गोल फिरणारा पंखा आपल्याला हवा नक्की कशी देतो? अनेकदा आपण तासनतास पंख्याखाली बसतो, पण म्हणावी तशी हवा लागत नाही. अशा वेळी आपण म्हणतो, "आज काय पंख्याला हवाच नाहीये!" पण मित्रांनो, दोष हवेचा नसून तुमच्या पंख्याच्या फिरण्याच्या दिशेचा' असू शकतो.
बहुतेक लोकांना वाटतं की पंखा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (Clockwise) फिरतो. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देणारा पंखा हा खरं तर घड्याळाच्या उलट दिशेने फिरत असतो. हो तुम्ही बरोबर वाचलत की उन्हाळ्यातील पंखा हा उलट्या दिशेनं फिरणारा हवा. हे कसं शक्य, चला जाणून घेऊ
पंख्याच्या पात्यांची (Blades) रचना ही विमानाचा पंखा किंवा प्रोपेलरसारखी थोडी झुकलेली असते. जेव्हा पंखा फिरतो, तेव्हा ही पाती हवेला एका विशिष्ट दिशेला ढकलतात.
advertisement
1. उन्हाळ्यातील दिशा (Anticlockwise):
उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो आणि शरीराला थंडाव्याची गरज असते. अशा वेळी पंखा जेव्हा घड्याळाच्या उलट दिशेने फिरतो, तेव्हा त्याची पाती हवेला थेट खाली ढकलतात. यामुळे अंगावर हवेचा झोत येतो आणि घामाचे बाष्पीभवन होऊन आपल्याला विंड चिल इफेक्टमुळे 4-5 अंश सेल्सिअसने कमी तापमान जाणवते.
2. हिवाळ्यातील दिशा (Clockwise):
तुम्हाला माहित आहे का? परदेशात किंवा खूप थंडी असलेल्या ठिकाणी लोक हिवाळ्यातही पंखा लावतात. पण तेव्हा पंखा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (Clockwise) फिरणारा असतो. यामुळे पंख्याची पाती खालची हवा वर खेचतात. छतापाशी असलेली गरम हवा यामुळे खाली ढकलली जाते आणि खोलीत उबदारपणा जाणवतो.
advertisement
तुमची ही 'चुकीची समजूत' तर नाही ना?
अनेकदा आपण खालून पंख्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला तो नेमका कोणत्या दिशेला फिरतोय हे समजत नाही. स्टँडर्ड नियम असा आहे की, पंख्याकडे खालून पाहिल्यावर तो जर डावीकडून उजवीकडे (Anti-clockwise) फिरत असेल, तरच तो तुम्हाला खाली हवा देईल. जर तो उजवीकडून डावीकडे फिरत असेल, तर तो हवा वर खेचत आहे.
advertisement
काही आधुनिक पंख्यांमध्ये एक छोटा 'रिव्हर्स स्विच' असतो, ज्याद्वारे तुम्ही ऋतूप्रमाणे पंख्याची दिशा बदलू शकता. जर दिशा चुकीची असेल, तर पंखा कितीही वेगाने फिरला तरी तुम्हाला हवी तशी हवा लागणार नाही.
टेबल फॅन आणि सीलिंग फॅनमध्ये काय फरक आहे?
सीलिंग फॅन आणि टेबल फॅनची मोटरची वायरिंग वेगवेगळी असते. सीलिंग फॅन बहुतेकदा 'अँटी-क्लॉकवाईज' फिरण्यासाठी डिझाइन केलेले असतात, तर टेबल फॅन किंवा पेडेस्टल फॅन हे 'क्लॉकवाईज' फिरून हवा समोर ढकलतात. हे सर्व त्यांच्या पात्यांच्या कोनावर (Blade Angle) अवलंबून असते.
advertisement
पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला हवा कमी लागेल, तेव्हा पंख्याच्या वेगासोबतच त्याची दिशाही तपासा. योग्य दिशेने फिरणारा पंखाच तुम्हाला उन्हाळ्याच्या त्रासापासून वाचवू शकतो.
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Fan : पंखा फुल स्पीडवर तरीही हवा कमी? यामागे आहे पंखा फिरण्याची चुकीची दिशा, 90% लोकांना हे माहितच नाही
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement