advertisement

समोसा खाला आणि मालकाच्या हाताला घेतला चावा अन् बोटाचा पार तुकडाच पाडला, मुंबईतील खळबळजनक घटना

Last Updated:

लक्ष्मीधीर मलिक याने समोसा आणि कटलेट फस्त केलं. त्यानंतर जेव्हा बिल देण्याची वेळ आली तेव्हा त्याने वाद घालायला सुरुवात केली.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई: मुंबईमध्ये कुठेही फिरायला गेला तर सहज ठिकठिकाणी तुम्हाला वडापाव आणि समोसा हे मिळणार म्हणजे मिळणारच. त्यामुळे मुंबईची ही एक वेगळी ओळख समजली जाते. पण, दिंडोशीमध्ये समोसा खाण्यावरून दुकानदार आणि ग्राहकामध्ये कडाक्याचं भांडण झालं. संतापलेल्या ग्राहकाने दुकान मालकाच्या बोटाला कडाक्याचा चावा घेतला आणि बोटाचा तुकडाच पाडला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोशी परिसरात २८ मार्च रोजी ही घटना घडली. या परिसरात रणजित सिंह यांचं फास्टफूडचं दुकान आहे. त्यांच्या दुकानांमध्ये नेहमी गर्दी असते. त्यावेळी  28 मार्च रोजी संध्याकाळी लक्ष्मीधीर मलिक नावाचा इसम दुकानात आला होता. त्याने समोसा आणि कटलेटची ऑर्डर दिली. लक्ष्मीधीर मलिक याने समोसा आणि कटलेट फस्त केलं. त्यानंतर जेव्हा बिल देण्याची वेळ आली तेव्हा त्याने वाद घालायला सुरुवात केली. समोसा आणि कटलेटचे पैसे इतके का म्हणत त्याने रणजित सिंह यांच्याही हुज्जत घातली.
advertisement
अंगावर धावून गेला अन् बोटाला चावा घेतला
दुकान मालक  रणजित सिंह यांनी या ग्राहकाची समजूत काढली. लक्ष्मीधीर मलिक याने ऑनलाईन पैसे सुद्धा भरले. पण तरीही मालकाला शिवीगाळ करत होता.  दुकान मालक रणजित सिंह यांनी लक्ष्मीधीर मलिकला  जाण्यास सांगितल्यावर तो अंगावर धावून गेला. रागाच्या भरात त्याने रणजित सिंह यांच्या बोटाचा चावा घेतला. नुसता चावा घेतला नाहीतर बोटाचा पार तुकडा पाडला. रणजित सिंह यांच्या हाताच्या मधलं बोटाचा या मलिकने तुकडा पाडला. त्यानंतर तातडीने रणजित सिंह यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
advertisement
या प्रकरणी रणजित सिंह यांनी  दिंडोशी पोलीस स्थानकात धाव घेतली. हल्लेखोर लक्ष्मीधीर मलिक याच्याविरोधात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधाराने मलिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
समोसा खाला आणि मालकाच्या हाताला घेतला चावा अन् बोटाचा पार तुकडाच पाडला, मुंबईतील खळबळजनक घटना
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement