advertisement

Ajit Pawar: अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात बोलताना अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Rapid Read
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अकोला: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने महाराष्ट्र सुन्न असतानाच, आता या प्रकरणात एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात बोलताना अपघाताबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. "विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होते," असे वक्तव्य करत अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

सरपंचांचा 'तो' दावा आणि मिटकरींचा गौप्यस्फोट

अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील सभेत बोलताना अपघाताच्या दिवसाचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, "घटनेच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता मी स्वतः घटनास्थळी पोहोचलो होतो. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक सरपंचांनी मला एक हादरवून टाकणारी माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पाहिले होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गावकरी धावले, पण ते जवळ पोहोचण्यापूर्वीच विमानाचा भीषण स्फोट झाला, असल्याचे मिटकरी यांनी सांगितले.
advertisement
या विमान अपघात प्रकरणात आता सरपंचांनी प्रत्यक्ष पाहिलेली ही बाब तपासाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

"हा घातपात असेल तर बदला घेणारच"

अजित पवारांच्या मृत्यूबाबत मिटकरींनी पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त केला आहे. आता अधिक आक्रमक होत त्यांनी स्पष्ट केले की, "हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत या मृत्यूचे गूढ उकलत नाही, तोपर्यंत मी जिवंत असेपर्यंत लढा देत राहीन. जर दादांच्या मृत्यूचा कट रचला गेला असेल, तर त्याचा बदला घेणे ही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे."
advertisement

तपासाच्या मागणीला जोर 

मिटकरींच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करणारी 'ती' व्यक्ती कोण होती? तांत्रिक बिघाड की घातपात? असे अनेक प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. या खुलाशांनंतर आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहेत.

इतर संबंधित बातमी:

advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar: अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement