advertisement

Ajit Pawar Last Audio Recording: ८.१९ वाजता मेसेज अन् ८.३७ वाजता फोन, शेवटच्या कॉलमध्ये अजित पवार काय म्हणाले? वाचा शब्द न् शब्द...

Last Updated:

Ajit Pawar Last Phone Call: अजितदादांनी अपघातापूर्वी साधलेल्या शेवटच्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मृत्यूला सामोरे जाण्यापूर्वी काही मिनिटे आधी दादा नक्की काय बोलले, याचा 'शब्द न् शब्द' आता समोर आला आहे.

८.१९ वाजता मेसेज अन् ८.३७ वाजता फोन, शेवटच्या कॉलमध्ये अजित पवार काय म्हणाले? वाचा शब्द न् शब्द...
८.१९ वाजता मेसेज अन् ८.३७ वाजता फोन, शेवटच्या कॉलमध्ये अजित पवार काय म्हणाले? वाचा शब्द न् शब्द...
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या विमान अपघाताबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच, आता अजितदादांनी अपघातापूर्वी साधलेल्या शेवटच्या संवादाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मृत्यूला सामोरे जाण्यापूर्वी काही मिनिटे आधी दादा नक्की काय बोलले, याचा 'शब्द न् शब्द' आता समोर आला आहे.

विमानातून केला होता अखेरचा फोन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ही शेवटची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली. अजित पवार यांनी त्यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांच्याशी हा संवाद साधला होता. विमान हवेत असताना आणि अपघाताच्या काही काळ आधी हा फोन आला होता, अशी माहिती श्रीजीत पवार यांनी दिली आहे.

काय होता तो 'शेवटचा संवाद'? 

advertisement
श्रीजीत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सकाळी ८:१९ मिनिटांनी अजितदादांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात एक मेसेज केला होता. विमानात रेंज मिळताच दादांनी स्वतःहून कॉल केला.

अजित पवारांनी एक मिनिटाच्या संवादात काय म्हटले?

अजित पवार: हॅलो हॅलो अरे बाबा.. दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्षं माळी समाजाचा माणूस आख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. आख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक काय एवढी एवढीशी नाही. तुम्हाला माहीत नसतं. काही नसतं. आम्हीपण सर्व जाती जाती-धर्मांना घेऊन जातो बाळा.
advertisement
श्रीजीत पवार: आहे दादा, मला जे वाटलं ते मी तुमच्या समोर मांडलं.
अजित पवार:  मान्य आहे. परंतु बरोबर आहे तुमच्या माळी समाजाच्या उमेदवाराला मी सुप्यामध्ये जिल्हा परिषदेची मी उमेदवारी दिली आहे. इथं ओबीसीचं रिजर्वेशन होतं. बाकीच्यांनी दिले नाही. पक्षांनी दुसरीच दिले आहे. त्या पद्धतीने आपण केला आहे.
श्रीजीत पवार: दादा तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने करा..ओके..ओके थँक्यू
advertisement
श्रीजीत पवार यांनी सांगितले की, "दादांशी माझे केवळ एक मिनिट बोलणे झाले. ते विमानात होते, पण तरीही त्यांनी मेसेजची दखल घेऊन कामासाठी फोन केला." शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणातील सामाजिक समतोल आणि सर्वसमावेशकतेचा विचार अजितदादांच्या मनात होता, हेच या संवादातून स्पष्ट होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Last Audio Recording: ८.१९ वाजता मेसेज अन् ८.३७ वाजता फोन, शेवटच्या कॉलमध्ये अजित पवार काय म्हणाले? वाचा शब्द न् शब्द...
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement