Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचे 58 व्हिडीओ समोर कसे आले? खरा मास्टरमाईंड कोण? प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ashok Kharat Nashik Crime Case : अशोक खरातचे 58 व्हिडीओ समोर कसे आले? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला होता. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आलीये.
Ashok Kharat Nashik Crime Case (लक्ष्मण घाटोळ, प्रितिनिधी) : राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. अशोक खरातच्या अटकेनंतर राजकीय कनेक्शन समोर आले. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे अश्लील व्हिडीओ समोर आले होते. पण या प्रकरणाने ट्विस्ट घेतला. 29 डिसेंबरचा फिर्यादी, 18 मार्च रोजी आरोपी झाला. मात्र, अशोक खरातचे 58 व्हिडीओ समोर कसे आले? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला होता. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आलीये.
नीरज जाधव प्रकरणाचा मास्टर माइंड
अशोक खरातच्या मर्जीतील ऑफिस बॉय संशयित नीरज जाधव यानेच सगळा गेम केला, अशी माहिती समोर येत आहे. नीरज जाधव हा प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं समजतंय. डिसेंबर 2025 मध्ये नीरजनेच खरातच्या नकळत महिलांवरील कार्यालयातून 58 बलात्काराचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. नीरज जाधव अशोकच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला अशोकच्या काळ्या करारनाम्याचा संशय आला. दुष्कृत्य करूनही खरात समाजात 'साधू' म्हणून वावरत असल्याचे पाहून नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली.
advertisement
खरातकडे पाच कोटी रुपयांची खंडणी
नीरज जाधवने खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. नीरज आणि त्याच्या काही साथीदारांनी या वादग्रस्त क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचीही माहिती समोर आली आहे. पण खरातने नीरजच्या धमक्यांना भाव दिला नाही. तुला काय करायचं ते कर.. असं म्हणत त्याने नीरजला फाट्यावर मारलं. त्यानंतर नीरजने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला अन् इथंच फास टाकला.
advertisement
व्हिडीओ मेहुण्याला पाठविला अन् खरातची कोंडी
नीरजने शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावलं. या महिलेचं आणि खरातचं बोलणं झालं. नीरज धमकी देत असल्याचं पीडितेने खरातला कळविलं. परंतु, खरातने स्वतःला वाचविण्यासाठी तिला पोलिसात जाण्याचा मार्ग सुचवला. खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाल्याने नीरजने सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला अन् खरातची कोंडी झाली. मेहुण्याने या प्रकरणाकडे गांभिर्याने घेतलं अन् पिडितेला धीर देण्याचा प्रयत्न केला अन् पोलिसात फिर्याद फिर्यादीसाठी सांगितलं. पिडीतेने मेहुण्याचं म्हणणं ऐकलं अन् पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर भोंदू बाबाचा गेम ओव्हर झाला आहे.
advertisement
अशोक खरातला अटक
दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरातला ताब्यात घेतलं होतं. आता त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 20, 2026 10:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचे 58 व्हिडीओ समोर कसे आले? खरा मास्टरमाईंड कोण? प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट!










