डेब्यू फिल्म अन् रातोरात फेमस झाली SRK ची हिरोईन, लग्न होताच बॉलिवूडला रामराम, आज 45,000 कोटींची मालकीण
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बॉलिवूडची ती सौंदर्यवती, जिने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त एकाच चित्रपटात काम केले, तरीही त्या एका चित्रपटाने प्रेक्षकांवर असा प्रभाव पाडला की लोक तिला आजही विसरलेले नाहीत. या सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या पहिल्या चित्रपटानंतर इंडस्ट्रीतून निवृत्ती घेतली. ती ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आहे, पण आजही तिचे आयुष्य लॅविश आयुष्य जगतेय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गायत्री जोशीचा जन्म 1977 साली महाराष्ट्रातील नागपूर येथे एका मराठी जोशी कुटुंबात झाला. ती रामनिवास रुंडाला आणि हेमा मिलानी यांच्या कन्या असून त्यांना अहाना जोशी नावाची एक बहीण आहे. गायत्रीने आपल्या करिअरची सुरुवात व्हिडिओ जॉकी म्हणून केली आणि मॉडेलिंगमध्येही नाव कमावले. ज्यात कॅडबरी पर्कच्या एका प्रतिष्ठित जाहिरातीचा समावेश आहे. 'स्वदेस' प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एका वर्षानंतर 2005 मध्ये या अभिनेत्रीने लग्न करून संसार थाटला.
advertisement
गायत्रीने भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या ओबेरॉय रियल्टीचे प्रमुख, उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला. त्यांना विहान आणि युवा ही दोन मुले आहेत. लग्नानंतर गायत्रीने स्वतःला पूर्णपणे कुटुंबासाठी वाहून घेतले आणि मुलांवर व घराकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या.
advertisement









