advertisement

हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा

Last Updated:

आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, हळद आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.

+
News18

News18

मुंबई: मंगळवार, दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, हळद आणि डाळिंबाची आवक आणि भाव पाहू.
आल्याच्या आवकेत सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2589 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 869 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 13 क्विंटल आल्यास 2875 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
हळदीला दराची झळाळी
राज्याच्या मार्केटमध्ये आज 1117 क्विंटल हळदीची आवक झाली. यापैकी 1100 क्विंटल सर्वाधिक आवक हिंगोली मार्केटमध्ये राहिली.
त्यास प्रतीनुसार 13000 ते 16000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 17 क्विंटल हळदीस 18500 ते 23000 रुपये दरम्यान उच्चांकी बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या दरात चढ-उतार
आज राज्याच्या मार्केटमध्ये 2951 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1371 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 9000 ते 15000 रुपये दरम्यान दर मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 28 क्विंटल डाळिंबास 1300 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement