advertisement

Bhiwandi Crime : आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, मग धक्कादायक कांड, प्रियकराच्या 'त्या' कृत्याने अख्खं शहर हादरलं

Last Updated:

Bhiwandi Shocking News : भिवंडीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक केल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. या प्रकरणी प्रियकराविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

News18
News18
भिवंडी : भिवंडी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरानेच आपल्या प्रेयसीसोबत केलेल्या कृत्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
प्रियकराकडून प्रेयसीची भयंकर फसवणूक
लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय तरुणाने 21 वर्षीय तरुणीची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध ठेवत तिला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र विश्वास मिळवल्यानंतर त्याने तिच्या इच्छेविरुद्ध गैरकृत्य केले असा आरोप पीडितेने केला आहे.
पीडित तरुणी आणि सूरज बालाजी लहुते (वय23) यांची ओळख काही महिन्यांपूर्वी झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. आरोपीने वारंवार लग्न करणार असल्याचे सांगत तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर एकांतात भेटी दरम्यान त्याने तिच्यावर जबरदस्ती केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
advertisement
धमकी देऊन सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप
इतकेच नव्हे तर या घटनेबाबत कुणालाही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने पीडितेकडून सोन्याचे दागिनेही घेतल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे तरुणी मानसिक तणावात होती. अखेर तिने नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पीडितेच्या तक्रारीवरून नारपोली पोलिसांनी आरोपी सूरज लहुते याच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Bhiwandi Crime : आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, मग धक्कादायक कांड, प्रियकराच्या 'त्या' कृत्याने अख्खं शहर हादरलं
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement