भुजबळांची हॉस्पिटलमधली सभा गाजली अन् येवल्यात भाकरी फिरली, पुतण्याने केली कमाल
- Published by:Prachi Amale
Last Updated:
छगन भुजबळ आजारी असल्याने येवला नगपालिका निवडणुकीची धुरा भुजबळांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी हाती घेतली होती.
नाशिक : राज्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदांचे निकाल हाती येत आहेत. 2 डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमधील 246 नगरपरिषदांच्या जागांसाठी यंदा निवडणुका (Local Body Elections) घेण्यात आल्या आहेत. मात्र नाशिकमधील येवल्याचा गड हा मंत्री छगन भुजबळ यांनी कायम राखला आहे. येवला हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्रा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येवला नगर परिषदेमध्ये छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
येवला हा राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येवला नगरपालिका निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. छगन भुजबळ यांच्यावर काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर ह्रदय शस्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सध्या विश्रांती घेत आहे. त्यामुळे येवला नगपालिका निवडणुकीच्या प्रचारात भुजबळांना सहभागी होता आले नाही. त्यांच्या अनुपस्थितीच निवडणूक झाली.
advertisement
समीर भुजबळ यांच्या नेतृत्वावर येवलेकरांनी शिक्कामोर्तब
छगन भुजबळ आजारी असल्याने येवला नगपालिका निवडणुकीची धुरा भुजबळांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी हाती घेतली होती. येवल्यात समीर भुजबळ तळ ठोकून होते. अखेर भुजबळांच्या
अनुपस्थितीत पुतण्यने गड राखला आहे. भुजबळांचे (राष्ट्रवादी-भाजप) युतीचे उमेदवार राजेंद्र लोणारी हे 1100 मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रुपेश दराडे यांचा त्यांनी पराभव केला. समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात नगरपालिकेत राष्ट्रवादी - भाजपचा झेंडा फडकवला आहे. समीर भुजबळ यांच्या नेतृत्वावर येवलेकरांनी शिक्कामोर्तब कले आहे.
advertisement
येवल्यात कोणाला किती मतं मिळाली?
- राष्ट्रवादी काँग्रेस राजेंद्र लोणारी यांना मिळालेली मते - 16326
- शिवसेना (शिंदे) रुपेश दराडे यांना मिळालेली मते - 15161
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - 11
- भाजप - 03
- शिवसेना - 10
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - 02
येवल्यात निकाल फिरला
छगन भुजबळ यांनी हॉस्पिटलमधूनच प्रचाराची रणनिती आखली होती. हॉस्पिटलमधूनच त्यांनी येवलेकरांना संबोधित केलं होतं . विकासाच्या दावे-प्रतिदाव्यांतून निवडणुकीला मोठी रंगत आली होती. रुपेश दराडे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांचीही येवल्यात सभा झाली होती. एकनाथ शिंदे यांनी तर येवल्यात आजवर विकासच झाला नाही असा दावा केला होता. परंतु त्यानंतर हॉस्पिटलमधून भुजबळांनी येवलेकरांशी साधलेल्या संवादानंतर निवडणुकीचा निकाल फिरला.
advertisement
हे ही वाचा :
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 5:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भुजबळांची हॉस्पिटलमधली सभा गाजली अन् येवल्यात भाकरी फिरली, पुतण्याने केली कमाल









