अरेरे...फडणवीस सरकारमध्ये मोठा मंत्री, पण बायकोला पराभूत होतान पाहिलं; घरणेशाहीला नाकारलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नगरपालिका निवडणुकी पती भाजपचा मंत्री जरी असला तरी पत्नीला लोकांनी नाकरले आहे.
जळगाव : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे (Nagar Palika Election) निकाल हाती येत आले असून घराणेशाहीला लोकांनी सपशेल नकार दिल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील भुसावळमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिला राखीव निघाल्यानंतर त्या जागी आपल्या सौभाग्यवतींची वर्णी मंत्री संजय सावकारे यांनी लावली. मात्र पती भाजपचा मंत्री जरी असला तरी पत्नीला लोकांनी नाकरले आहे. भाजपचे मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीचा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.
भुसावळमध्ये मंत्री संजय सावकरे दोन मंत्री व दोन आमदारांच्या सौभाग्यवतींनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. त्यामुळे या मंत्र्यांसह आमदारांना आपल्या मतदारसंघातील नगरपालिकांमधील पक्षाच्या उमेदवारांसह सौभाग्यवतींना निवडून आणण्याची दुहेरी जबाबदारी होती. मात्र निकालानंतर आता समोर आले आहे. भाजपच्या रजनी सावकारे यांचा पराभव झाला असून तेथे राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
advertisement
जनतेनं घराणेशाहीला थारा नसल्याचं दाखवून दिलं
भुसावळमध्ये रजनी सावकारे यांचा पराभव झाला आहे. रजनी सावकारे यांचा 1800 मतांनी पराभव झाला आहे. राष्ट्रवादी च्या गायत्री भंगाळे - गौर विजयी झाल्या आहेत. मंत्र्याची पत्नी असल्याने नगरपालिकेतील लढत केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता, मंत्र्याच्या राजकीय प्रतिष्ठेची कसोटी पाहणाऱ्या ठरली होती.मात्र जनतेने मंत्र्याच्या पत्नीला नाकरले आहे. जनतेनं घराणेशाहीला थारा नसल्याचं दाखवून लोकांनी दाखवून दिलं. भाजपने तिकीट दिल्याने जिल्ह्यात ही नगरपरिषद चर्चेचा विषय बनली होती. इथे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
advertisement
नेत्यांच्या नात्यागोत्याचा गोतावळा उमेदवार यादीत
नगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांऐवजी घराणेशाहीला झुकतं माप दिलं होतं त्यामुळ निवडणुकीच्या रिंगणात नेत्यांच्या नात्यागोत्याचा गोतावळा उमेदवार यादीत पाहायला मिळाला होता. पण घराणेशाहीला लोकांनी नाकारले असून तसा स्पष्ट मेसेजच दिला आहे. खरं तर नेत्यांसाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी या निवडणुका असतात. पण नेत्यांनीच आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याच चित्र दिसताच आता जनेतेने यांना धडा शिकवला आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 4:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अरेरे...फडणवीस सरकारमध्ये मोठा मंत्री, पण बायकोला पराभूत होतान पाहिलं; घरणेशाहीला नाकारलं










