वडिलांपेक्षाही 10 वर्षांनी मोठा, 83 वर्षाच्या अभिनेत्यासोबत श्रद्धा कपूरला जायचंय ड्रीम डेटवर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने एका व्यक्तीसोबत कॉफी डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या व्यक्तीचं नाव ऐकूण सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
advertisement
advertisement
advertisement
KBC 17 च्या नव्या एपिसोडदरम्यान स्पर्धकाने अमिताभ यांना म्हटले,“मला वाटते माझ्यासारखा श्रद्धाचा इतका वेडा चाहता कुणीच नसेल. सर, छोट्या तोंडी मोठी गोष्ट वाटेल, पण मला श्रद्धा जींना फक्त एकदाच डेटवर न्यायचं आहे.” हे ऐकून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले आणि अमिताभ बच्चन यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली.
advertisement
अमिताभ यांनी विचारले की त्यांना श्रद्धाच्या वडिलांचे नाव माहीत आहे का? त्यावर स्पर्धकाने उत्तर दिले की हो, ते शक्ती कपूर आहेत, ज्यांना ‘क्राइममास्टर गोगो’ म्हणून ओळखले जाते. अमिताभ हसले आणि मग कॅमेऱ्याकडे पाहत श्रद्धाला विनंती केली की जर ती खरंच हा कार्यक्रम पाहत असेल, तर या ऑफरचा नक्की विचार करावा—त्याच्यासोबत डेटवर जावे आणि कॉफी प्यावी. अमिताभ बच्चन यांचं हे वक्तव्य ऐकून श्रद्धाचा चाहता हसला आणि दिग्गज अभिनेत्याचे आभार मानले.
advertisement
advertisement










